शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दोघा घरफोड्यांना अटक; १६ लाखांचा ऐवज जप्त

By admin | Updated: April 2, 2016 00:36 IST

आणखी गुन्हे उघडकीस येणार : गडहिंग्लज परिसरातील सात घरफोड्यांची कबुली; आज न्यायालयात हजर करणार

कोल्हापूर : गडहिंग्लज परिसरात बंद घर दिसले की फोडणाऱ्या दोघा अट्टल घरफोड्यांना शिताफीने गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी राजासाहब गुलाब नाईकवडी (वय २५) व मोदीन रसूल सुतार (४९,रा. सोलापूर, ता. हुक्केरी, जि. बेळगांव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४५ तोळे सोने व दहा किलो चांदीचे दागिने असा सुमारे १६ लाख ७ हजार किमतीचा ऐवज हस्तगत केला. त्यांच्याकडून आणखी काही घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. गडहिंग्लज परिसरात दि. १५ फेब्रुवारीपासून गावोगावी घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. चोरट्यांच्या सुळसुळाटाने नागरिक हैराण झाले होते तर पोलिसांची झोपच उडाली होती. प्रत्येक घरफोडीची पद्धत एकसारखी असल्याने अशाप्रकारचे गुन्हे सीमाभागातील गुन्हेगार करतात, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांना मिळाली. त्यांनी पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांना माहिती घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियांका शेळके, कॉन्स्टेबल आर. एल. पाटील, अशोक शेळके, दयानंद बेनके, संदीप कांबळे, संतोष घस्ती यांनी कर्नाटक सीमाभागातील पोलिस ठाण्यांतून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली असता राजासाब नाईकवडी व मोदीन सुतार यांची नावे पुढे आली. त्यांना त्यांच्या सोलापूर येथील घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गडहिंग्लज शहर, आत्याळ, बेळगुंदी, भडगांव, हनिमनाळ, नांगनूर तसेच हातकणंगले तालुक्यातील हुपरी-रेंदाळ आदी ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरीचे दागिने सोलापूर गावाशेजारी ओढ्याजवळ झुडपात दोन फूट जमिनीत पुरून ठेवले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पिशवीमध्ये ठेवलेले दागिने मिळाले. हा परिसर निर्जन असल्याने या दागिन्यांची चाहूल कोणाला लागली नाही. गेल्या दीड महिन्यांत त्यांनी चोरीचे दागिने लपविले, त्यांची विक्री केली नाही. नाईकवडी याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सुतार याला आज, शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले.दिवसा टेहाळणी,रात्री घरफोडी राजासाब नाईकवडी याच्या आईचा बांगड्याचा व्यवसाय आहे. तो व साथीदार मोदीन सुतार हे दिवसा गावोगावी फिरत बंद घराची टेहाळणी करत असत. त्यानंतर रात्री बंद घर फोडत असत. घरफोडी करताना मोदीन हा बाहेर पाळत ठेवत असे व राजासाब हा आतमध्ये शिरून दागिने लंपास करत असे. हे दोघेही सराईत चोरटे असून त्यांच्यावर संकेश्वर, निपाणी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.