शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वसंत मुळीक यांचा तेवीस वर्षे लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:38 IST

कोल्हापूर : ज्या काळात मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल फारशी जागृती नव्हती तेव्हापासून या समाजासाठी निष्ठेने झगडणाऱ्या वसंत मुळीक यांचा आरक्षणाचा ...

कोल्हापूर : ज्या काळात मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल फारशी जागृती नव्हती तेव्हापासून या समाजासाठी निष्ठेने झगडणाऱ्या वसंत मुळीक यांचा आरक्षणाचा निर्णय झाल्यावर आनंदाने ऊर भरून आला. गेली २३ वर्षे ते मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय आहेत.कॉलेज जीवन संपल्यावर एकदा आण्णासाहेब पाटील यांच्या मराठा लाख मेळाव्यास उपस्थित राहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातून भारावून जाऊन त्यांनी मराठा समाजासाठी काम करण्याचे ठरविले. पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून त्यांनी एमएसईबीमध्ये नोकरी केली; परंतु हे करतच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्ह्यात २५० गावांत शाखा सुरू केल्या. वधूवर मेळावे, गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप यांतून सुरू झालेले काम मराठा आरक्षणाच्या चळवळीपर्यंत आले. या कामात त्यांना वसंतराव घाटगे, चंद्रकांत चव्हाण, प्रकाश पाटील, कसबा बावडा येथील बी. जी. पाटील, शंकरराव शेळके यांचे सहकार्य लाभले.कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडील काही वर्षांत मराठा महासंघ म्हटले की, वसंत मुळीक हा त्याला समानार्थी शब्द झाला होता. इतके ते या कामाशी एकरूप झाले होते. मुळात स्वभाव मनमिळावू व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती यामुळे ते मराठा आरक्षणाच्या चळवळीतही सेतू म्हणून काम करू शकले. या कामात त्यांना तरुण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा मोठा आधार राहिला. मराठा समाज समुद्रासारखा आहे. त्याचे संघटन करणे खूप अवघड होते. आम्ही मेळावा घेतला तर एकेकाळी ५ माणसेही जमत नव्हती; परंतु तेच आरक्षणाच्या मोर्चावेळी मात्र लाखोंने लोक रस्त्यावर आले. आरक्षणाबरोबरच या समाजातील चुकीच्या चालीरीती याबाबत प्रबोधन करणार असल्याचे ते म्हणाले.