शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

जिल्ह्यातील वीस हजार कर्मचारी शुक्रवारी संपावर

By admin | Updated: August 28, 2016 00:39 IST

राज्य सरचिटणीस अनिल लवेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

कोल्हापूर : देशस्तरावरील कामगार-कर्मचाऱ्यांच्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर महागाई व बेरोजगारीला आळा घाला; कंत्राटीकरण, खासगीकरण रद्द करा, आयकर गणनेसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवा, वेतन पुनर्रचनेसाठी केंद्र सरकारने राज्यांना आर्थिक मदत द्यावी, यासाठी देशातील ११ केंद्रीय कामगार संघटनांनी शुक्रवारी (दि. २) देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्णातील २० हजारांहून अधिक सरकारी कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती राज्य सरचिटणीस अनिल लवेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. लवेकर म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांसह कामगारांच्या १२ मागण्यांसाठी ११ केंद्रीय कामगार संघटनांनी शुक्रवारी (दि. २) देशव्यापी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्णातील २० हजारांहून अधिक वर्ग ३ व ४ चे सरकारी कर्मचारी जिल्हाव्यापी संपात सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कृषी विभाग, शिक्षण विभाग, आय.टी.आय., शासकीय तंत्रनिकेतन, गव्हर्न्मेंंट प्रेस, आदी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता टाऊन हॉल उद्यान येथे सर्व कर्मचारी एकवटणार आहेत. या ठिकाणी बैठक होऊन संघटनांच्या प्रतिनिधींचे मार्गदर्शन होणार आहे. यानंतर दुपारी एक वाजता कर्मचाऱ्यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे. दसरा चौक, सुभाष रोड, उमा टॉकीज, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महानगरपालिका या मार्गांवरून येऊन टाऊन हॉल उद्यान येथे रॅलीचा समारोप होईल. जिल्हाध्यक्ष वसंत डावरे, संजय क्षीरसागर, प्रकाश शेलार, सतीश ढेकळे, नितीन कांबळे, के. एम. बागवान, उत्तम पाटील, बी. एस. खोत, हाश्मत हावेरी, शुभांगी फुटाणे, अंजली देवरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)