शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खर्चीवाल्यांची वीस कोटींची पिळवणूक

By admin | Updated: March 18, 2016 00:57 IST

रत्येक तीन वर्षांनी वाढलेल्या कामगार वेतन, वाढीव वीज दर, महागाई अशा प्रमाणात मजुरीवाढ दिली जाते. सन २०१३ मध्ये ५२ पिकाच्या कापडास प्रतिमीटर साडेपाच पैसे मजुरी ठरली होती.

राजाराम पाटील-- इचलकरंजी  -वस्त्रोद्योगात असलेल्या आर्थिक मंदीच्या गोंडस नावाखाली बड्या कापड उत्पादक-व्यापाऱ्यांकडून खर्चीवाले (जॉब वर्क) यंत्रमागधारकांची महिन्याला वीस कोटी रुपयांची पिळवणूक केली जात आहे. वीज दर कामगारांची मजुरी आणि महागाईने पिचलेल्या या यंत्रमागधारकांचे कंबरडे मोडले असून, हजारो यंत्रमागधारकांनी आंदोलन सुरू केले आहे. या अस्वस्थतेचे अशांत आंदोलनात रूपांतर होण्यापूर्वी प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घालून याप्रकरणी सन्माननीय तोडगा काढावा, अशी जाणकारांची मागणी आहे.येथील काही बडे कापड व्यापारी व कापड उत्पादकांकडून शहर व परिसरातील सुमारे चाळीस हजारांहून अधिक यंत्रमागांवर जॉब वर्क पद्धतीने कापड उत्पादन करून घेतले जाते. इचलकरंजीतून बेळगाव, सांगली, सातारा जिल्ह्यांतील काही यंत्रमाग कारखान्यांना सूत बिमे देऊन कापड विणून घेतले जाते. त्यापैकी खर्चीवाले (जॉब वर्क) यंत्रमागधारकांना प्रत्येक तीन वर्षांनी वाढलेल्या कामगार वेतन, वाढीव वीज दर, महागाई अशा प्रमाणात मजुरीवाढ दिली जाते. सन २०१३ मध्ये ५२ पिकाच्या कापडास प्रतिमीटर साडेपाच पैसे मजुरी ठरली होती. त्याला तीन वर्षे उलटून गेल्यानंतर या मजुरीमध्ये जानेवारी २०१६ पासून वाढ व्हावी, अशा आशयाची मागणी करणारे निवेदन इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने कापड व्यापाऱ्यांच्या इचलकरंजी क्लॉथ अँड यार्न मर्चंटस् असोसिएशन संघटनेला दिले होते. खर्चीवाले यंत्रमागधारकांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून याप्रकरणी त्यांनी मध्यस्थी करावी, अशा आशयाची मागणी केली. त्याप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांकडे तीन संयुक्त बैठका झाल्या; पण कापड व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी,आर्थिक मंदी असल्याने आपल्याला मजुरीमध्ये वाढ करून देता येणार नाही, हेच पालुपद चालू ठेवले. मात्र, त्यांच्याकडे आग्रह होताच प्रत्येक यंत्रमाग कारखान्याच्या स्तरावर व्यापाऱ्यांनी चर्चा करून मजुरी ठरवावी, अशीही पळवाट व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी शोधली. जॉबर, कांडीवाला, वहिफणी अशा कामगारांच्या वेतनामध्येसुद्धा वाढ झाली आहे, तर यंत्रमागासाठी लागणारे सुटे भाग आणि अन्य प्रकारच्या महागाईत दीडपट ते दुपटीने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये खर्चीवाले यंत्रमागधारकांना चार रुपये ६८ पैसे प्रतिमीटर मजुरी मिळावी, अशी मागणी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. तरीसुद्धा मजुरीत वाढ झाली नसल्याने महागाईने कंबरडे मोडलेल्या यंत्रमागधारकांची आणखीन पिळवणूक चालू आहे. मजुरीवाढ दिली पाहिजे : आवाडेखर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीवाढ मिळावी, या मागणीसाठी गुरूवारी शहरातील जनता चौकामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. निदर्शनाचे नेतृत्व इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने केले. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, इचलकरंजीचा विकास कामगार, यंत्रमागधारक, व्यापारी-व्यावसायिक यांच्यामुळेच झाला आहे, असे सांगितले. ते म्हणाले, सध्याच्या वाढलेल्या महागाईचा, कामगारांच्या मजुरीचा, वीज दराचा विचार करून कापड व्यापाऱ्यांनी खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीवाढ दिली पाहिजे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता मजुरीवाढीचा प्रश्न सोडवावा, असेही आवाहन त्यांनी केले. याचवेळी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी, प्रांताधिकारी कार्यालयात शनिवारी (दि.१९) होणाऱ्या संयुक्त बैठकीत तोडगा न निघाल्यास सोमवारी (दि.२१) व्यापारी असोसिएशनच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली.