बेळगाव : येथील मोबाईल दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी बारा लाख किमतीचे २०८ मोबाईल संच आणि रोख एक लाख लंपास केले. काल, बुधवारी रात्री ही घटना घडली.कॉलेज रोड या शहरातील प्रमुख रस्त्यावर इम्रान पठाण यांचे मोबाईलचे दुकान आहे. काल रात्री पठाण नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले. आज, गुरुवारी सकाळी त्यांना दुकान फोडल्याचे समजले. लगेच त्यांनी खडेबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरट्यांनी दुकानातील मोबाईल विस्कटले होते. खडेबाजार पोलिसांनी श्वानपथक मागवून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला; पण श्वान काही अंतरावर जाऊन घुटमळले.
बेळगावमध्ये बारा लाखांचे मोबाईल लंपास
By admin | Updated: January 16, 2015 00:14 IST