शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बारा तासांची वीज आता आठ तासांवर

By admin | Updated: November 18, 2016 23:09 IST

शेतकरी अडचणीत : गरज असलेल्या काळात चार तास वीज कपात

प्रकाश पाटील -- कोपार्डे सलग १२ तास वीज देण्याची मुदतवाढ नसल्याने आता शेती पंपासाठी पुन्हा बारा तासांऐवजी आठ तासच वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सध्याच्या उन्हाच्या तडाख्यात ऊस पिकांना पाण्याची आवश्यकता असताना वीजकपातीचा निर्णय चुकीचा असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.आॅक्टोबर महिन्यात राज्य शासनाने रब्बी हंगामाकरिता सलग १२ तास वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रात्री १० ते सकाळी १०, तर दिवसा सकाळी १० ते रात्री १० अशी वीज शेतीपंपाना देण्यात येत होती. काही ठिकाणी अनेक अडचणींवर मात करून सुरळीत वीजपुरवठाही सुरू होता. ही मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत होती. त्यानंतर पुन्हा १२ तासांऐवजी वीजपुरवठा आठ तास करण्यात येत आहे. ही मुदत वाढविण्याबाबत शासनाकडून विद्युत वितरण कंपनीला कोणताच आदेश आला नसल्याने मंडळाने आठ तासच वीज देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.काही ठिकाणी अवकाळी किंवा परतीच्या पावसाने दांडी मारली असून, पिकांना पाण्याची मोठी गरज आहे. विशेष करून दुष्काळी पट्ट्यात अजिबातच पाऊस झाला नव्हता. तेथे परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने विहीर, नद्या, धरणे, तलावात आता पाण्याची उपलब्धता आहे. हे पाणी वेळेवर रब्बी पिकांना मिळाले तर उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, यासाठी शेतीपंपासाठी किमान १२ तास वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे व्हावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.सहवीज प्रकल्पातून वीज खरेदी करावीअलीकडे सहवीज प्रकल्पातून तयार झालेली वीज महाग पडत असल्याने महावितरणने ती खरेदी करण्यास नकार दिला आहे. मात्र, ही वीज खरेदी करून कमी पडणारी वीज उपलब्ध होईल. साखर कारखान्यांना त्यातून जादा उत्पन्न मिळेल व उसाला जादा दर देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. म्हणून सहवीज प्रकल्पातून उत्पादित होणारी वीज खरेदी करावी, अशी मागणी होत आहे. शेतीसाठी पाण्याची गरज डिसेंबरनंतरच जास्त लागते. शेतीपंपांना वीज योग्य प्रमाणात दिल्यास पिकाला पाणी देऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मागील वर्षी पाण्याच्या कमतरतेमुळे उपसाबंदी लागू झाली. यामुळे पिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. यावर्षी पाऊस भरपूर झाला असून, पाणी भरपूर आहे. पण वीज नसल्यास शेतकऱ्यांचे हात मोडल्यासारखे होईल. यामुळे पूर्वीप्रमाणे १२ तास वीजपुरवठा व्हावा.- संजय जोतिराम पाटील, शेतकरी, वाकरे, ता. करवीर