शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

टस्कर देतोय वनविभागासह शेतकऱ्यांना हुलकावणी

By admin | Updated: March 4, 2015 23:42 IST

वाकिघोलमध्ये वनकर्मचारी कार्यरत : पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, परिसरात भीतीचे वातावरण

संजय पारकर - राधानगरी  अभयारण्याच्या वाकिघोल परिसरात आलेल्या टस्कराने घेतलेल्या एका बळीमुळे येथील नागरिकांबरोबर वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही झोप उडाली आहे. दिवसभर जंगलात दडणारा हत्ती रात्री गावाजवळच्या शेतात घुसतो. तो मानवी वस्तीत येऊ नये म्हणून वन्यजीवचे कर्मचारी पंधरा दिवसांपासून रात्रंदिवस गस्त घालत आहेत. शेतकरीही पिके वाचविण्यासाठी धडपडत आहेत.मागील काही वर्षांत येथील गव्यामुळे होणाऱ्या नुकसानीला येथील शेतकरी वैतागले आहेत. उन्हाळभर दररोज रात्री गव्यांना हुसकावण्याचे कामच शेतकऱ्यांना लागले आहे. गव्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरे, तसेच माणसेही जखमी झाली आहेत. काहींना प्राणही गमवावा लागला आहे. बिबट्याने पाळीव जनावरे मारण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. या सर्व त्रासांमुळे शेतकऱ्यांमध्ये वनविभागाबद्दल मुळातच असंतोष आहे. हत्तीच्या आगमनामुळे त्यामध्ये आणखी भर पडली आहे. हत्तीच्या हल्ल्यात बळी पडलेल्या बाळकू आरेकर यांचा मृतदेह ताब्यात घेताना हा असंतोष प्रकट झाला होता. त्याचा उद्रेक होऊ नये, यासाठी वन्यजीव विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस धडपडत आहेत. यापूर्वी सात वर्षांपूर्वी आलेल्या टस्करानेही असाच धुमाकूळ घातला होता. तो थेट हसणे, राधानगरीजवळच्या परिसरात आला होता. त्याचा माग काढण्यासाठी गस्त घालताना एका वनमजुराला प्राणाला मुकावे लागले होते. त्यामुळे गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्याही जिवाला धोका आहे. तरीही दिवसभर जंगलात असणारा हत्ती रात्री मानवी वस्तीत घुसू नये, यासाठी हे कर्मचारी कार्यरत आहेत. येथील कर्मचाऱ्यांबरोबर चांदोली, कोयना येथील कर्मचारीही यासाठी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे यासाठी वन्यजीव विभागाने हत्ती हटाव मोहीम हाती घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सिंधुदुर्गात ही मोहीम यशस्वी झाली आहे; पण हा परिसर अभयारण्यात येतो. त्यामुळे काही कायदेशीर अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. हत्तीला विरोध म्हणून नव्हे, तर माणसांच्या जगण्यासाठी तरी याबाबत वन्यजीव विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. वाकिघोल परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात उसाचे पीक उभे आहे. शिवाय केळी, उसाची लागण, खोडवा अशी हिरवी पिके असल्याने हत्तीला ती पर्वणीच आहे. जवळच काळम्मावाडी धरणाचे पाणी असल्याने या परिसरातून हा हत्ती सहजासहजी जाण्याची शक्यता कमी आहे.