शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नेसरी परिसरात टस्कर हत्तीचे दर्शन

By admin | Updated: September 8, 2015 23:45 IST

टस्करचे व्हॉटस् अ‍ॅपद्वारे व्हायरल

नेसरी : नेसरीसह तळेवाडी, अर्जुनवाडी परिसरात टस्कर हत्तीचे अचानक दर्शन झाले. परिसरातील शेतवडीत टस्कर दिसल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाला असून, हत्ती आल्याची बातमी समजताच तरुण वर्ग हत्तीला पाहण्यासाठी धावपळ करीत होता.या टस्कर हत्तीचा वावर चंदगड तालुक्यातील नागनवाडी क्षेत्रातील जंगलात सोममवारपासून होता. मंगळवारी पहाटे अर्जुनवाडी, तळेवाडी परिसरात अचानक आगमन झाले. हत्ती आल्याची बातमी नेसरी पोलीस ठाण्याला कळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास तळेवाडी मार्गे नेसरीकडे या हत्तीने आगमन केले. येथील नेसरी-आजरा मार्गावरील मारियान रेगे या शेतकऱ्याच्या शेतातून कृषी महाविद्यालयाच्या परिसरात फिरून परत मारियान रेगे यांच्या शेतात टस्कर दोन तास ठाण मांडून होता.हत्तीला पाहायला झालेली गर्दी व गोंधळामुळे हत्ती बिथरून पळत होता. बघ्यांची यामुळे कमरणूक झाली. दरम्यान, वनविभागानेही शर्थीचे प्रयत्न करून तळेवाडी-अर्जुनवाडी या आलेल्या वाटेनेच माघारी फिरविले. या धावपळीत रेगे यांच्या ऊस पिकाचे नुकसान केले. नेसरीचे सपोनि राकेश हांडे व कर्मचारी वनरक्षक बी. बी. पाटील, बाळकृष्ण दरेकर, लक्ष्मण पाटील, राजन देसाई, आदी अधिकाऱ्यांसह वनविभागाचे कर्मचारी टस्करावर लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)टस्करचे व्हॉटस् अ‍ॅपद्वारे व्हायरलयापूर्वी सामानगड, बटकणंगले, हंदेवाडी मार्गे किणे पठारावरून हत्ती गेल्याचा, तर कानडेवाडी येथील भैयासाहेब कुपेकर यांच्या शेतात हत्तीच्या पाऊलखुणा दिसल्या होत्या. मात्र, मंगळवारी दिवसाढवळ्या हत्तीचे दर्शन झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. तरुण वर्गाची हत्तीला पाहण्यासाठी गर्दी होती. बऱ्याच मोबाईलधारकांनी या हत्तीची प्रतिमा आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंद करून व्हॉटस अ‍ॅपद्वारे व्हायरल केली.