शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

शिरोळमधील उद्योग अडचणीत

By admin | Updated: September 1, 2015 23:26 IST

कामगारांचा प्रश्न गंभीर : तालुक्यातील औद्योगिक वसाहती मंदीच्या चक्रव्यूहात

संतोष बामणे - जयसिंगपूर  शिरोळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक उद्योग मंदीच्या चक्रव्युहात अडकले असून, या परिसरातील अनेक उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे उद्योगावर अवलंबून असणारे व्यवसायिक व कामगार आर्थिक अरिष्टात सापडला असून, कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. इचलकरंजीतील संपाचा परिणामही शिरोळ तालुक्यात झाला आहे.तालुक्यात ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहत, छ. शाहू महाराज औद्योगिक वसाहत व पार्वती औद्योगिक वसाहत असून, याठिकाणी अनेक मोठे व लघु उद्योग आहेत. यामध्ये शेती उत्पादनावर आधारित, कापड उद्योग, मशिनरी, अॉटो पार्ट असे उद्योग आहेत. तसेच जिल्ह्यातील व परराज्यातील अनेक कामगार येथे काम करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मंदीचे सावट आल्याने विविध उद्योग अडचणीत सापडले आहेत. शंभरहून अधिक छोट्या-मोठ्या उद्योगांना काम नसल्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.वसाहतीमध्ये छोटे-मोठे उद्योग असून, सर्व व्यवसाय एकमेकांवर अवलंबून आहेत. येथील माल सातासमुद्रापार पोहोचला आहे. तालुक्यामध्ये कामगारांची आर्थिक घडी बसविणाऱ्या या औद्योगिक वसाहतीला अवकळा लागली आहे. शासनाने वीज दरवाढ केल्याने उद्योगांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथील उद्योग परराज्यात स्थलांतरीत होत आहेत. जागतिक मंदीमुळे शिरोळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादित होणारे स्पेअरपार्टचे काम कमी झाल्यामुळे छोटे उद्योग बंद पडत आहेत. यामुळे यावर अवलंबून असणारे घटक आर्थिक अरिष्टात सापडले आहेत. शासनाने वीज बिलाबाबत लवकर तोडगा काढला पाहिजे, अन्यथा उद्योग इतरत्र स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.- दिलीप पाटील-कोथळीकर, अध्यक्ष, ल. क. अकिवाटे वसाहतऔद्योगिक क्षेत्रासाठी सध्या असणारी वीज बिलाची आकारणी न परवडणारी आहे. शासनाने वीज बिलाची दरवाढ कमी करून औद्योगिक वसाहतींना चालना देण्याची गरज आहे. उद्योग टिकले तरच कामगार टिकतील, अन्यथा बेरोजगारीची समस्या वाढण्याची शक्यता आहे. डॉ. अशोकराव माने, अध्यक्ष, शाहू औद्योगिक वसाहतइचलकरंजी येथील कामगारांच्या संपाचा यड्रावमधील पार्वती इंडस्ट्रीजवरही परिणाम झाला आहे. वस्त्रोद्योग हे एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे उद्योगही बंद पडले आहेत. यामुळे कामगार व मालक दोघेही भरडे जात असून, यावर तोडगा काढण्याची गरज आहे.- सचिन मगदूम, यंत्रमाग उद्योजक, यड्राव