शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीचा तगादा बेततोय बळिराजाच्या जिवावर

By admin | Updated: March 28, 2016 00:20 IST

ग्रामीण भागात सावकारकी जोमात : अनेक शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर

गणपती कोळी -- कुरुंदवाड --सावकाराच्या वसुलीच्या तगाद्याने शिरढोण (ता़ शिरोळ) येथील प्रकाश रामू कोरे या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली़ यातून ग्रामीण भागातील वास्तव स्पष्ट होत आहे़ दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाण्याअभावी वाळत असलेले उभे पीक, घसरलेला उसाचा दर, यातून सोसायटी, बँकेची कर्जे फिटण्याची शक्यता नाही़ अशातच खासगी सावकार वसुलीचा तगादा लावत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवरील खासगी सावकाराचा फास आवळत आहे़ त्यामुळे यावर वेळीच उपाय करण्याची गरज आहे़ बारमाही वाहणाऱ्या नद्या, सुपीक जमीन, उत्पादित मालाला मिळणारी बाजारपेठ त्यामुळे येथील शेतकऱ्यांची उलाढालही मोठी असते़ मुख्य पीक ऊस असले तरी भाजीपाला, कडधान्ये, फळभाजी पिकविण्यात येथील शेतकरी माहीर आहेत़ ऊस पिकाला सेवा सोसायटी, बँकांतून कर्ज दिले जाते़ सोसायटीकडून एकरी ३५ ते ४० हजार रुपये, तर बँकेकडून ६० हजार रुपये कर्ज दिले जाते़ उत्पादन खर्च, मजुरी यासह इतर खर्च वाढल्याने शेतकऱ्याचा कर्जरूपात मिळणाऱ्या पैशांवर खर्च भागत नाही़ पिकांचे उत्पादन जादा घेऊन जास्त आर्थिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांची शेतीसाठी लागेल तो खर्च करण्याची तयारी असते़ उत्पादन आल्यावर सर्वच देणी भागविण्यात येईल, या आशेवर खर्चाची उलाढाल करण्यासाठी खासगी सावकाराचा आधार घेतला जातो़ ग्रामीण, शहरी भागात राजरोजसपणे सावकारकी चालू आहे़ शेतकऱ्यांची अडचण पाहून व्याजाचा दर आकारला जातो़ यामध्ये पाच, दहा, पंधरा टक्क्यांपर्यंत व्याजाचा दर असतो़ शेतीचा खर्च व संसाराचा गाडा चालविण्यासाठी आगतिक झालेल्या शेतकऱ्याला सावकारकीचे पाय धरावे लागत आहेत. शेतकऱ्याकडे मासिक व्याज देण्याची व्यवस्थाच नसल्याने त्याचाच गैरफायदा घेत सावकार व्याजावर व्याज लावून चक्रवाढ व्याजाप्रमाणे वर्षाअखेर त्याची रक्कम वसूल करतो़ यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे हा शेतकरी अडचणीत आला आहे़ पाऊसच नसल्याने विशेषत: ऊस पिकाची वाढ झाली नाही़ त्यामुळे एकरी उताऱ्यात कमालीची घट आलेली आहे़ पीक उत्पादन खर्चात वाढ झाली असताना यंदा उसाचा दरही घसरला आहे़ या एकूणच दृष्टचक्रामुळे शेतकऱ्यांनी सेवा सोसायटी, बँकांचे घेतलेले कर्जही फिटेना़ त्यामुळे बँकेने मार्चअखेर खाती ‘निल’ करण्यासाठी तगादा लावला आहे़ कर्जदार शेतकऱ्यांचे बँकेचेच पैसे फिटत नसल्यामुळे आपले पैसे कधी मिळणार म्हणून खासगी सावकार कर्जदारांच्या पाठी लागला आहे़ या वसुलीच्या तगाद्याने कर्जदार शेतकरी संकटातून शॉर्टकट मार्ग काढण्यासाठी विषाचा प्रयोग करीत आहेत. यातूनच बिनबोभाट चालू असलेली ग्रामीण भागातील खासगी सावकारकी चव्हाट्यावर आली असून, शेतकऱ्यांवर सावकारीचा फास आवळत आहे़घेतलेले कर्ज परत करणे गरजेचे आहे़ मात्र, व्याजाची आकारणी, परिस्थिती याचे भानही सावकराने राखणे तितकेच आवश्यक आहे़ शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर एकदा निर्णय घेण्याऐवजी सावकारांवर अंकुश ठेवून सावकारांच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे़