शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘बिद्री’ च्या सत्तेचा मंगळवारी फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 18:10 IST

बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार, याचा फैसला मंगळवारी होणार आहे. दुपारी तीनपर्यंत संस्था गटाचा निकाल अपेक्षित असून, संपूर्ण निकालासाठी मात्र बुधवारी पहाटेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

ठळक मुद्देदुपारपर्यंत संस्था गटाचा निकाल संपूर्ण निकालासाठी बुधवारची पहाट उजाडणारनिकालाबाबत कमालीची उत्सुकता!

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार, याचा फैसला मंगळवारी होणार आहे. दुपारी तीनपर्यंत संस्था गटाचा निकाल अपेक्षित असून, संपूर्ण निकालासाठी मात्र बुधवारी पहाटेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

‘बिद्री’साठी रविवारी अत्यंत चुरशीने विविध गटांतील ५८ हजार ८५९ मतदारांपैकी ४७ हजार २७७ (८०.३२ टक्के) मतदारांनी मतदान केले. संस्था गट वगळता सर्वाधिक मतदान गट क्रमांक तीन कागलमध्ये ८५.६४ टक्के मतदान झाले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी विकास आघाडी व आमदार प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक व दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू विकास’ आघाडी यांच्यात सरळ लढत झाली.

दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. निवडणुकीत झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.

 मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून लोणार वसाहत येथील रामकृष्ण हॉलमध्ये मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मोजणी १८७ टेबलांवर होणार असून, पहिल्यांदा संस्था गटाची मोजणी प्रक्रिया होणार आहे.

साधारणत: दुपारी तीन वाजता संस्था गटाचा निकाल अपेक्षित आहे. गत निवडणुकीच्या मतमोजणीत झालेला विलंब व वाढलेले मतदान यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी जादा टेबलांची मांडणी केली आहे. यासाठी ३७४ कर्मचाºयांची नेमणूक केली असून, शंभर कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.

मतपत्रिकेच्या वर्गीकरणाची प्रक्रिया संपल्यानंतर दुपारी एकनंतरच गटनिहाय मतमोजणीस सुरुवात होईल. त्यामुळे साधारणत: बुधवारी पहाटेपर्यंत संपूर्ण निकाल लागण्याची शक्यता आहे.

निकालाबाबत कमालीची उत्सुकता!

‘बिद्री’चे कार्यक्षेत्र चार तालुक्यांत असले तरी निवडणुकीबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे. रविवारी मतदान झाल्याने सोमवारी सकाळपासूनच निकालाची चौकशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीकडे केली जात होती.