शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

स्वार्थासाठीच माझ्या बदनामीचा प्रयत्न

By admin | Updated: July 17, 2014 00:15 IST

रणजित परमार : कायदेशीर लढा देण्याचा इशारा

कोल्हापूर : सराफ संघाचा अध्यक्ष म्हणून एक रुपयाचाही फेरफार केलेला नाही, उलट संघाच्या हिताचेच निर्णय घेतले आहेत. आज माझ्यावर आरोप करणाऱ्या माजी अध्यक्षांनीच तीन महिन्यांपूर्वी माझ्या अभिनंदनाचा ठराव केला होता. आता मात्र स्वार्थासाठी जातीय तेढ आणि हिशेबाचे कारण पुढे करत मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, मी अशा दबावाला भीक घालणार नाही. त्यांनी हे प्रकार थांबवावेत; अन्यथा मी त्यांच्याविरोधात कायदेशीर लढा देईन, असा इशारा सराफ संघाचे अध्यक्ष रणजित परमार यांनी पत्रकार परिषदेत दिला. संघाचे विद्यमान अध्यक्ष परमार आणि माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिशेब आणि अध्यक्षपदाची मुदतवाढ अशा विषयांवरून वादावादी सुरू आहे. या वादाचे पर्यावसान आता आरोप -प्रत्यारोपांत झाले असून आज, बुधवारी परमार यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचा खुलासा केला. ते म्हणाले, माजी अध्यक्षांनी आपली मुदत संपण्याच्या एक दिवस आधी संघाची २ कोटी रुपये किमतीची जागा फक्त १० लाख रुपये आणि ७ हजार रुपये भाडे एवढ्या अल्प किमतीत सोनाली ड्रेसेसला कायमस्वरूपी दिली. त्यासंबंधीच्या कागदपत्रांचीही पूर्तता केली. या व्यवहाराविरोधात आम्ही न्यायालयात गेलो म्हणून त्यांना माझा राग आला. त्यांना अध्यक्ष होण्याची घाई झाली झाल्याने ही आदळआपट सुरू केली आहे. येत्या २३ तारखेला होणाऱ्या संघाच्या बैठकीत मी कामाचा अहवाल मांडेन. त्यानंतर संघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर केली जाईल. सभासद देतील तो निर्णय मी मान्य करेन. यावेळी उपाध्यक्ष संजय कदरे, सचिव सुरेश ओसवाल, रामचंद्र संकपाळ, शिवराज पवार, धर्मपाल जिरगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)