शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावकारीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: March 22, 2016 01:14 IST

शिरढोण येथील शेतकरी : प्रकृती चिंताजनक; परिसरात खळबळ

कुरुंदवाड : खासगी सावकारीच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून शिरढोण (ता़ शिरोळ) येथील एका शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ प्रकाश रामू कोरे (वय ४५) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ या घटनेमुळे खासगी सावकारात खळबळ उडाली असून, ग्रामीण भागातील खासगी सावकारी चव्हाट्यावर आली आहे़दरम्यान, चार दिवसांपूर्वी प्रकाश कोरे याने खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून कुरुंदवाड पोलिस ठाण्यात तक्रार केली होती़ त्यावर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी़ एस़ हाके यांनी सावकार व कोरे यांना बोलावून आपआपसात समझोता करून वाद मिटवावा, असा सबुरीचा सल्ला देऊन प्रसंगी तक्रार दिल्यास सावकारीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता़तक्रारीनुसार प्रकाश कोरे यांनी टाकवडे येथील एका बड्या खासगी सावकराकडून २०१३ मध्ये तीन लाख रुपये कर्ज स्वरुपात घेतले होते़ अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी करून रकमेच्या सुरक्षिततेसाठी म्हणून सावकाराने गट नं़१६१३ ची शेती सहा लाख रुपये पोटी करारपत्र लिहून घेतले़ शिवाय सहा लाख रुपये एकरकमी द्या, नाहीतर प्रत्येक महिन्याला व्याज द्या, असे धमकावत व्याजापोटी १ लाख ७५ हजार रुपये आजपर्यंत दिले आहेत़ असे असताना जादा व्याजासहीत नऊ लाख रुपयांची मागणी करून बाहेरच्या गुंडाकरवी जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे तक्रारी अर्जात कोरे यांनी म्हटले आहे़चार दिवसांपूर्वी कोरे यांनी कुरुंदवाड पोलिसात सावकाराविरोधात तक्रार केली होती़ यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हाके यांनी सावकार व कोरे यांना बोलावून घेवून पैसे किती दिले व घेतले हे दोघांना माहीत असून, आपआपसात समझोता करून वाद मिटवावा अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला होता़त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून समाधानकारक तडजोड होत नव्हती़ तसेच कोरे यांचा ऊस तोडला असून, सावकाराने ऊस अडविल्याने चार दिवसांपासून तुटलेला ऊस वाळत आहे़ त्याच संतापातून व सावकाराच्या त्रासाला कंटाळून सकाळी दहाच्या सुमारास घरामध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ विष प्यायल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला इचलकरंजी इंदिरा मेमोरियल रुग्णालयात दाखल केले़ मात्र विषाची बाधा अधिक झाल्याने डॉक्टरांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे़ या घटनेची रात्री उशिरापर्यंत कुरुंदवाड पोलिसांत नोंद झाली नव्हती. (वार्ताहर)