शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनशीलता शोधण्याचा प्रयत्न करा

By admin | Updated: February 20, 2016 00:40 IST

तारा भवाळकर यांचे आवाहन : कोल्हापुरात ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला प्रारंभ

कोल्हापूर : परिवर्तनशीलता शोधण्याचा प्रयत्न करा. त्यासह चिंतन करून समाजाचे मन समजून घ्या, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी शुक्रवारी येथे केले.येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. महालक्ष्मी हॉलमधील या कार्यक्रमास ‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हमीद दाभोलकर उपस्थित होते. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारिणीची बैठक व अधिवेशन आयोजित केले आहे.डॉ. भवाळकर म्हणाल्या, आपल्या देशात विविधता आहे. जो पूजापाठ करतो तो कर्मठच असतो असे नाही. त्यामुळे याकडे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी योग्य पद्धतीने पाहावे. समाजाचे अंतर्बाह्य परीक्षण, वाचन करावे, त्यातून बारकावे समजतील. विविध घटनांबाबत विचार, वाचन करून आपल्या पद्धतीने परीक्षण करून ते समाजाच्या प्रयोगशाळेत तपासून पाहावे. संतपरंपरेतील समाज वैज्ञानिक भूमिका समजून घ्यावी. सद्य:स्थितीत आध्यात्मिक लोकशाही गरजेची आहे. मी आणि माझ्याभोवतीचा समाज यातील अनुबंध म्हणजे अध्यात्म असे मी मानते. आध्यात्मिक लोकशाहीद्वारे एकमेकांची मते समजून घ्यावीत.पाटील म्हणाले, समविचारी पक्षांशी एकजूट करून आपली भूमिका निभावण्याची गरज आहे. राजकीय, सामाजिक पातळीवरील बदलांकडे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी अभ्यासपूर्वक लक्ष द्यावे. यावेळी कॉ. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘अंनिस’चे कोल्हापूर शहर कार्याध्यक्ष सुजाता म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईटे, उमेश सूर्यवंशी, के. डी. खुर्द, धनाजीराव जाधव, कृष्णात कोरे, संजय बनसोडे, विनायक साबळे, सीमा पाटील, आर. एस. कुलकर्णी, आदींसह राज्यातील ‘अंनिस’चे कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा सचिव रमेश वडणगेकर यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी आभार मानले. यावेळी संघटन बांधणी, वैज्ञानिक जाणिवा याबाबत चर्चा झाली.