शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस महानिरीक्षकपदी विश्वास नांगरे-पाटील

By admin | Updated: June 25, 2016 00:41 IST

तरुणांच्यात उत्सुकता

कोल्हापूर/मुंबई : येथील कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती झाली. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यावेळी ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलिस अधिकारी होते. नांगरे-पाटील यांची एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख आहे. आतापर्यंत त्यांनी पोलिस सेवेत बजाविलेल्या कामगिरीबद्दल त्यांना सन २०१३ मध्ये राष्ट्रपती शौर्यपदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांची अप्पर पोलिस महासंचालकपदी बढतीवर मुंबईला बदली झाली. त्यांच्या जागी नागपूरचे राज्य राखीव दलाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रकाश मुत्याळ यांची प्रभारी नियुक्ती झाली होती. शुक्रवारी राज्यातील वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विश्वास नांगरे-पाटील हे सध्या औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी म्हणून कार्यरत होते. त्यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्तीने पश्चिम महाराष्ट्राला चांगला अधिकारी मिळाला आहे. ते लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नांगरे-पाटील यांची ओळख विश्वास नांगरे-पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी झाला. त्यांचे वडील गावचे सरपंच होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात बी. ए. मधील सुवर्णपदक पटकावून उत्तीर्ण झाले. उस्मानिया विद्यापीठातून एमबीएची पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात अधीक्षक असताना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याच्यावेळी हॉटेल ताजमध्ये पोहोचणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते सोबत फक्त दोन कॉन्स्टेबल आणि एक अंगरक्षक तसेच अंगावर सुरक्षा कवच (बुलेटप्रुफ जॅकेट) नसतानाही ते गोळीबार सुरू असलेल्या ‘ताज’मध्ये शिरले. प्रतिकारासाठी त्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले. त्यांच्या या कारवाईने दहशतवाद्यांना हॉटेल ताजच्या नवीन इमारतीत जाण्यापासून रोखले. त्यानंतर नांगरे-पाटील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले व सीसीटीव्हीच्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वरिष्ठांना देत राहिले. त्यांनी आतापर्यंत अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीस दल उपायुक्त, ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई पश्चिम विभाग अप्पर पोलीस आयुक्त आदी पदांवर काम केले आहे. तरुणांच्यात उत्सुकता विश्वास नांगरे-पाटील यांची तरुण वर्गात क्रेझ आहे. स्पर्धा परीक्षेसाठी ते नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यांची कोल्हापूरच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याचे समजताच तरुणांच्यात उत्सुकता वाढली आहे. गेल्या अठरा वर्षांपासून मी पोलिस प्रशासनात काम करीत आहे. आता मी माहेरी येत असून या ठिकाणी काम करण्यास वेगळा आनंद मिळेल. - विश्वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक