शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तृप्ती देसाई यांना मारहाण ही शरमेची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 00:40 IST

मेघा पानसरे यांचे मत : संबंधितांवर कारवाईची मागणी

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून देवीचे दर्शन घेणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना असभ्य शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या प्रवृत्तींचा भारतीय महिला फेडरेशनतर्फे जिल्हा अध्यक्ष मेघा पानसरे यांनी निषेध केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावेत व दोषींवर कारवाई करण्याची मागणीही फेडरेशनने केली आहे. जोतिबा फुले यांच्या महाराष्ट्रात एकविसाव्या शतकातही मंदिरांत पुजाऱ्यांचा अंमल असावा व त्यांनी भाविक महिलांचा वापर करून एका स्त्रीला मंदिरात मारहाण करावी ही शरमेची बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,‘ स्त्रियांना कोणत्याही मंदिरात प्रवेश नाकारला जाणार नाही याची हमी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनास दिले आहेत. जिल्हाधिकारी व पोलिसांनी स्त्रियांना प्रवेश रोखणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करून कारवाई केली पाहिजे, असेही या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. तृप्ती देसाई यांना सुरक्षितपणे गाभाऱ्यात नेणे ही प्रशासनाची जबाबदारी होती; परंतु त्यांनी दक्षता न घेतल्याने परिस्थिती चिघळली. कोण्याही सामान्य भाविक महिलेने गाभाऱ्यात जाण्याचे धाडस करू नये, याच उद्देशाने तथाकथित धर्म व संस्कृती रक्षकांनी कायदा हातात घेण्याचे कृत्य केले आहे. महाराष्ट्र हिंदू प्लेसेस आॅफ पब्लिक वरशीप अ‍ॅक्ट १९५६ नुसार कोणीही हिंदू धर्मातील कोणत्याही वर्ग वा विभागाच्या व्यक्तीला हिंदूंच्या कोणत्याही सार्वजनिक पूजा व प्रार्थनास्थळी पूजा, प्रार्थना वा धार्मिक सेवा करण्यापासून रोखता येणार नाही, अडथळा आणता येणार नाही वा परावृत्त करता येणार नाही. हा कायदा मोडल्यास सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते. स्त्रियांना प्रवेश रोखणे हा त्यांच्या नागरिक म्हणून असलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. शनिशिंगणापूरच्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आपण स्त्री-पुरुष समतेच्या बाजूने असल्याचे जाहीर केले आहे. मग या सर्व उद्रेकात ते का मौन बाळगून आहेत. ठाम भूमिका घेऊन प्रशासनाला ठोस कारवाईचे आदेश का देत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. स्वागतार्ह पाऊलतृप्ती देसाई ह्या स्वत: धार्मिक हिंदू आहेत. त्यांनी धर्माअंतर्गत स्त्री-पुरुष समतेचे संविधानिक तत्त्व प्रस्थापित करण्यासाठी पाऊल उचलले आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. पोशाखाचा मुद्दा उपस्थित करून त्यांना गाभाऱ्यात प्रवेश नाकारणे बेकायदेशीर असल्याचे पानसरे यांनी म्हटले आहे.