मुंबई : अल्पकाळात दामदुप्पट करून देण्यासह विविध आमिषे दाखवून आठ लाख गुंतवणूकदारांची १० हजार कोटी रुपयांची फसवणूक गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात झाली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव केला जातो. आतापर्यंत अशा प्रकारे ९३ कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यात आले आहेत, असे पाटील यांनी सांगितले. फसव्या जाहिराती देणाऱ्या कंपन्यांवर पोलिसांनी फसवणुकीची वाट न पाहता स्वत:हून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे अर्जुन खोतकर, भाजपाचे संजय केळकर आदींनी केली. लायन ओक इंडिया कंपनीच्या नावाखाली मुंबईत १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मूळ प्रश्न शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला होता. (विशेष प्रतिनिधी)
वाळू चोरीत चक्क पोलिसाच्या मालकीचा ट्रक?
By admin | Updated: July 15, 2015 00:42 IST