शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ताराबाई पार्क प्रभागात तिरंगी लढत--राष्ट्रवादीचा उमेदवार लढणार अपक्ष?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 20:35 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मतांची विभागणी टाळण्यासाठी कॉँग्रेस-राष्टÑवादी तसेच भाजप-ताराराणी आघाडी एकत्र लढणार असून, शिवसेना मात्र स्वतंत्र लढणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर दोन्ही कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून लढणार आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी अद्याप कोणीही उमेदवारी अर्ज भरलेला नाही.

ताराबाई पार्क प्रभागात कोण-कोण उमेदवार असणार याबाबत गेल्या चार दिवसांपासून उत्सुकता होती; परंतु ती आता संपली आहे. कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक मंगळवारी (दि. १९) रात्री झाली. बैठकीस उपमहापौर अर्जुन माने, गटनेता शारंगधर देशमुख, माजी महापौर आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, नगरसेवक मुरलीधर जाधव, राहुल माने, अफजल पीरजादे, विनायक फाळके, नंदकुमार मोरे उपस्थित होते. त्यांच्यासमोर उमेदवारी मागणाºया पाचजणांची नावे होती. त्यांतून रात्री राजेश लाटकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘तुम्ही निर्णय घ्या व आम्हाला सांगा,’ असा निरोप दिल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच ही बैठक पार पडली.

भाजप-ताराराणी आघाडीतर्फे रत्नेश शिरोळकर यांचे नाव निश्चित केले असून, ते ताराराणी आघाडीच्या चिन्हावर लढणार आहेत. माजी नगरसेवक नीलेश देसाई यांच्यासह ताराराणी आघाडी व भाजपचे कार्यकर्ते शिरोळकर यांच्या प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. देसाई यांनी त्यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे स्वत:कडे घेतली असून, त्यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मदत करण्याचे ठरविले आहे. शिवसेनेकडून राजू जाधव (भोरी) यांची उमेदवारी निश्चित आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या नावाला पसंती दिली आहे.पक्षीय भूमिका स्पष्ट झाल्यामुळे ताराराणी प्रभागात राजेश लाटकर, रत्नेश शिरोळकर, राजू जाधव (भोरी) अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता असून, अन्य दोन उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात असतील, असे चित्र आहे.... तर राजेश लाटकर अपक्षभाजप-ताराराणी आघाडीचा उमेदवार कोण, चिन्ह कोणते असेल यावर राजेश लाटकर यांनी निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवायची की नाही, हे ठरणार आहे. जर भाजप निवडणूक लढविणार असेल तर लाटकर यांनी राष्टÑवादीच्या चिन्हावर लढावे आणि ताराराणीचा उमेदवार असेल तर लाटकर अपक्ष म्हणून लढावे, असे बैठकीत ठरले.