शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील  पर्यटन शुल्कात तिपटीने वाढ; पर्यटकांमध्ये नाराजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 20:08 IST

सह्याद्री व्याघ्र राखीव नियामक मंडळाची बैठक नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली

अनिल पाटील 

सरूड -  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यास जाणाऱ्या पर्यटकांना आता वाढीव पर्यटन शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे . या व्याघ्र प्रकल्पातील पर्यटक शुल्कात तब्बल तिपटीने वाढ करण्यात आली आहे . यापुर्वी प्रति पर्यटक तीस रु आकारला जाणार पर्यटक कर आता प्रति पर्यटक शंभर रु प्रमाणे आकारण्यात येणार आहे . तर १२ वर्षाखालील लहान पर्यटक , गाईड , वाहन कर , कॅमेरा शुल्क या मध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे . या शुल्क वाढीने पर्यटकांच्यातुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

सह्याद्री व्याघ्र राखीव नियामक मंडळाची बैठक नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली . वनसंरक्षक तथा क्षेत्रपाल संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडुन बैठकीचे इतिवृत्त पाठविण्यात आले आहे . यामध्ये पर्यटन शुल्काच्या वाढीव दरास नियामक मंडळाकडुन मंजूरी देण्यात आली आहे . त्यानुसार हे दर वाढविण्यात आल्याची माहिती चांदोली चे वनक्षेत्रपाल ( वन्यजीव ) नंदकुमार नलवडे यांनी दिली . 

या व्याघ्र प्रकल्पात कोल्हापूर , सांगली , सातारा जिल्ह्या सह इतर जिल्ह्यांतील पर्यटकंही पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येत असतात . विशेषता सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते . लहान मुलापासुन अबाल वृद्धा पर्यंतचे पर्यटक येथे पर्यटनाचा आनंद लुटतात . यापुढे या सर्व पर्यटकांन वाढीव शुल्काचा भुर्दंड सहन करावा  लागणार आहे . पर्यटन वाढीव शुल्क खालील प्रमाणे तपशील   =               पूर्वीचे दर   =    आताचे दर 

१ ) १२ वर्षावरील पर्यटक = ३० रु       = १०० रु

२)  १२ वषीखाली पर्यटक = १५ रु       = ५० रु 

३)   गाईड फी                = २०० रु       = २५० रु

४)  वाहन शुल्क             = १५० रु        = २०० रु

५)  कॅमेरा शुल्क             = ५० रु         = १०० रु