शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्स्टेबलसह तिघे तिकीट तपासनिस दोषी

By admin | Updated: March 19, 2015 00:20 IST

निलंबन होणार : प्रस्ताव वरिष्ठांकडे; तरुणांना मारहाण प्रकरण भोवले

कोल्हापूर : छत्रपती शाहू टर्मिनल्स येथे तिकीट न काढता प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या दोघा भावांना बेड्या ठोकून अमानुषपणे बेदम मारहाण केल्याप्रकरणी रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल जयंत शिवाजी पाटील (वय २७, रा. कुंडलवाडी, जि. सांगली) व तिकीट तपासनिस आर. के. विश्वकर्मा (रा. छिंदवाड-मध्यप्रदेश), आबासाहेब मदणे (रा. सांगोला, जि. सोलापूर), कृष्णा फिरंगे (रा. कोल्हापूर) हे चौकशीमध्ये दोषी आढळून आले आहेत. या सर्वांच्या विरोधात निलंबनाचा प्रस्ताव पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला आहे, अशी माहिती मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी बुधवारी दिली. दरम्यान, मिरजेहून आलेल्या पोलीस उपनिरीक्षक अब्दुल जमादार, चंद्रकांत घुटकुडे यांच्यासह रेल्वे स्टेशन मास्तर सुग्रीव मीणा, अ‍ॅड. रमेश बदी यांची घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी तिकीट तपासनिस (टीसी) आर. के. विश्वकर्मा यांच्याकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. घडलेला प्रकार हा निंदनीय असल्याची खंत खुद्द पोलिसांनीच यावेळी व्यक्त केली. शाहू टर्मिनल्स येथे मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास निजामउद्दीन एक्स्प्रेस स्टेशनवर आली. यावेळी प्रवेशद्वारासमोर बाहेर पडणाऱ्या प्रवाशांकडे तिकीट तपासनिस विश्वकर्मा यांनी प्रदीप आनंदा राजे (वय ३२) व दीपक आनंदा राजे (३०, दोघे रा. शुक्रवार पेठ) यांच्याकडे तिकिटाची विचारणा केली. यावेळी ते पळून जावू लागल्याने तिकीट तपासनिस आबासाहेब मदने व कृष्णा फिरंगे यांनी त्यांना पकडले. यावेळी त्यांनी आम्ही नातेवाईकांची पार्सल देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले परंतु तिकीट न काढता प्लॅटफॉर्मवर फिरत असल्याने त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. फिरंगे यांनी त्यांना शिवीगाळ केल्याने ते दोघे तरुण संतापले आणि त्यांच्यात मारामारी सुरू झाली. यावेळी बंदोबस्तास असणारे रेल्वे पोलीस जयंत पाटील यांनी या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये बेड्या घालून बेदम चोप दिला. त्यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले. या प्रकरणाची माहिती समजताच मिरज लोहमार्गचे पोलीस निरीक्षक भिंगारदेवे, पोलीस उपनिरीक्षक जमादार यांनी कोल्हापुरात येऊन या प्रकरणाची माहिती घेतली. बुधवारी दिवसभर या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी फक्त तिकीट तपासनिस विश्वकर्मा एकटाच उपस्थित होता अन्य दोघेजण गायब होते.पाच रुपयांच्या तिकीटासाठी दोघा भावांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. त्या दोघांना दंड करण्याऐवजी त्यांना बेड्या ठोकून मारहाण केल्याने हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. त्यामुळे त्या पोलिसांवर फौजदारी दाखल करणार आहे. - अ‍ॅड. रमेश बदी, कोल्हापूर