शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हप्त्याला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: January 6, 2015 01:06 IST

रिक्षाचालकाचे कृत्य : शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोरच विषप्राशन

कोल्हापूर/ शिरोली : ‘महिन्याला दोन हजार रुपये हप्ता द्यायचाच’, अशी दमदाटी केल्यामुळे सदरबाजार येथील अ‍ॅपेरिक्षा चालकाने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर आज, सोमवारी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अंजूम अस्लम पठाण (वय २६, रा. सदरबाजार मशिदीजवळ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर सीपीआर आवारात रिक्षाचालकांसह मित्र परिवारांनी एकच गर्दी केली होती.याबाबत पठाण यांच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती अशी, गेल्या पाच वर्षांपासून अंजूम पठाण हा लुगडी ओळ ते शिरोली या मार्गावर रिक्षा व्यवसाय करतो. आज तो नेहमीप्रमाणे अ‍ॅपे रिक्षा (एम एच ०९ - जे - ५८४३) घेऊन शिरोलीकडे जात होता. सकाळी येथील एचएमटी फाटा स्थानकावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कॉन्स्टेबलनी पठाण याला अडविले. ‘महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता’ द्यावयाचा तरच व्यवसाय करायचा, असे सांगितले. त्यावेळी ‘आज काय व्यवसाय झालेला नाही आणि महिन्याला दोन हजार रुपये कसा हप्ता द्यावयाचा’, असा प्रश्न पठाणने पोलिसांना केला. त्यानंतर पोलिसांनी ही रिक्षा पोलीस ठाण्याच्या दारात आणून त्याच्यावर कारवाई केली. कारवाईनंतर अंजुमने पोलीस ठाण्यासमोर सायंकाळी विष प्राशन केले. या प्रकारामुळे पोलिसांचे धाबे दणाणले. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले. हा प्रकार समजताच शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. पी. यादव सीपीआर रुग्णालयामध्ये आले. पठाणवर रुग्णालयात उपचार सुरु होते. (प्रतिनिधी)दोन वर्षांपूर्वीची आठवणदोन वर्षांपूर्वी शिये (ता. करवीर) येथील हनुमाननगर परिसरातील रिक्षाचालकाने पोलिसाने हप्ता मागितला म्हणून आत्महत्या केली होती, अशी चर्चा यावेळी सीपीआर आवारात नागरिकांमधून सुरू होती. पठाणकडे ज्या पोलिसाने हप्ता मागितला त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक यावेळी करत होते.