शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याला वंदन करीत आरोग्याचे धड--सामूहिक सूर्यनमस्कार : ‘लोकमत’चा उपक्रम; भल्या पहाटे आबालवृद्धांसह नागरिकांची गर्दी

By admin | Updated: January 28, 2015 01:01 IST

सामूहिक सूर्यनमस्कार : ‘लोकमत’चा उपक्रम; भल्या पहाटे आबालवृद्धांसह नागरिकांची गर्दीे

कोल्हापूर : जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह व पतंजली योग समिती यांच्यावतीने आज, मंगळवारी झालेल्या सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमास कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या उपक्रमाचे युनिक आॅटोमोबाईल हे मुख्य प्रायोजक होते.धुके, बोचरी थंडी असूनसुद्धा अनेकांची पावले सहा वाजल्यापासूनच शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानाकडे वळत होती. यामध्ये लहान मुलांसह तरुण, तरुणी व वृद्धांचा सहभाग लक्षणीय होता. सातच्या सुमारास चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक भारत खराटे, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. नारायण, पतंजली योग समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर खापणे, सिनेटचे सदस्य अनिल घाटगे व ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने उपक्रमाची सुरुवात झाली.प्रारंभी गिरीश आरेकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. पतंजली योगपीठाचे अध्यक्ष चंद्रशेखर खापणे यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले. त्यानंतर योगशिक्षक डॉ. शरद हुन्सवाडकर यांनी सूर्यनमस्कारांची शास्त्रशुद्ध माहिती सांगून उपस्थितांकडून सूर्यनमस्कार करवून घेतले. नमस्कारासन, हस्तउत्तानासन, हस्तपादासन, पादसंचलनासन, पर्वतासन, अष्टांगासन, भूजंगासन, अशी आसने दाखवून त्यांची सविस्तर माहिती दिली. सुमारे तासभर हा उपक्रम झाला. याप्रसंगी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला. शांतिपाठ व राष्ट्रगीताने उपक्रमाची सांगता झाली. उपक्रमात सहभागींना युनिक आॅटोमोबाईलचे ग्रुप हेड सुधर्म वाझे व ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविले. या उपक्रमासाठी ओरिएंटल इंग्लिश स्कूलचे शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत स्कूलचे क्रीडाशिक्षक शरद पोवार, शैलेंद्र बनसोडे हे उपस्थित होते.मंगळवारी ‘लोकमत’ आयोजित सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करताना युनिक आॅटोमोबाईलचे ग्रुप हेड सुधर्म वाझे. शेजारी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले. कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर मंगळवारी ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रमात सहभागी झालेले नागरिक. दुसऱ्या छायाचित्रात सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रमात दीपप्रज्वलन करताना डॉ. शरद हुन्सवाडकर. याप्रसंगी डावीकडून दिव्यानी पालनकर, सूर्यकांत गायकवाड, चंद्रशेखर खापणे, रघुनाथ घाटगे, अनिल घाटगे, मकरंद देशमुख, भारत खराटे.