शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:22 IST

शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्यावतीने सकाळी सहा वाजता रुईकर कॉलनी येथील संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्यास मंत्रोच्चारात रूद्र जलाअभिषेक करण्यात ...

शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्यावतीने सकाळी सहा वाजता रुईकर कॉलनी येथील संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्यास मंत्रोच्चारात रूद्र जलाअभिषेक करण्यात आला. ध्येय आणि प्रेरणा मंत्र म्हणण्यात आला. जयजयकार करण्यात आला. यावेळी शंभूराजे मंचचे अध्यक्ष सूरज ढोली, अभिजीत इंगळे, प्रथमेश पाटील, विक्रम पाटील, सूर्यभान ढोली उपस्थित होते. या मंचच्या प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती, प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली. येथे शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने सकाळी सात वाजता छत्रपती शंभूराजे यांच्या मूर्तीस जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर फुलांची सजावट करून उपस्थित शिवभक्तांच्या हस्ते पूजन करून, पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ध्येय आणि प्रेरणा मंत्राचे पठण करण्यात आले. त्यानंतर साखरपेढ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, उपाध्यक्ष योगेश रोकडे, संदीप पाडळकर, सुशांत शिंदे, प्रशांत जाधव, प्रवीण कुरणे, प्रशांत पाटील, गणेश मांडवकर, तुषार खोंद्रे , तुकाराम खराडे , श्रेयस कुरणे , मनीष बडदारे, प्रभाकर पाटील, सुजित जाधव, तेजस जाधव, राज शिंदे , प्रथमेश लगाटे उपस्थित होते. पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे शिवशंभू भक्तांच्या उपस्थितीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पादुकांना जलाभिषेक, दुग्धाभिषेक करण्यात आला. ध्येय आणि प्रेरणा मंत्र, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्तोत्र म्हणण्यात आले. यावेळी ओंकार शिंदे, किसन खंदारे, प्रसन्न वैद्य, सिद्धेश सावंत, जयराज ओतारी, प्रणाम बुधले, संकेत पंडित, सुजवल घोटणे, शुभम माळवी, रत्नदीप चोपडे, आकाश गुरवळ, गौरव गुरवळ, आदी उपस्थित होते.

चौकट

सफाई कामगारांचा सत्कार

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्य संयुक्त जरगनगर-रामानंदनगरतर्फे भागातील सफाई कामगारांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आयसोलेशन हॉस्पिटल कोविड वॉर्ड येथे सफाई साहित्य झाडू, फरशी लिक्विड, मॉब, खराटे मदत म्हणून देण्यात आले. यावेळी अमोल कदम, नाना सावंत, अक्षय मगदूम, सुजय मेंगाणे, अथर्व साळोखे, तुषार पाटील, धनंजय जरग, संदीप पाटील, सागर कदम, निखिल शिरडवडे, अक्षय पोवार, तुषार जाधव उपस्थित होते.

चौकट

संयुक्त जुना बुधवार पेठेतर्फे जयंती साजरी

संयुक्त जुना बुधवार पेठेच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अनिल निकम, उदय भोसले,सुशील भांदिगरे,सुशांत महाडिक,महेश शिंदे,मकरंद स्वामी,राजू कुंडले, मोहित पाटणकर,महेश फुटाणे,नीलेश जाधव,बंडा आडगुळे,राम मिस्त्री उपस्थित होते.

फोटो (१४०५२०२१-कोल-संभाजीराजे जयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पापाची तिकटी येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

===Photopath===

140521\14kol_6_14052021_5.jpg

===Caption===

फोटो (१४०५२०२१-कोल-संभाजीराजे जयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पापाची तिकटी येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.