शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’साठी तिरंगी लढत

By admin | Updated: April 11, 2017 01:24 IST

नाट्यमय घडामोडी; महाआघाडीतही गोंधळ; २१ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात

भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडीनंतर तिरंगी लढत निश्चित झाली. कॉँग्रेस, महाआघाडी व सदाशिवराव चरापले यांची परिवर्तन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. ४८६ उमेदवारांनी माघार घेतल्याने २१ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे प्रा. किसन चौगुले व रघुनाथ जाधव यांनी ऐनवेळी माघार घेऊन नेत्यांना धक्का दिला. ‘भोगावती’साठी काँग्रेसने रविवारी रात्री सर्वप्रथम पॅनेलची घोषणा करून आघाडी घेतली होती तर महाआघाडीचा घोळ सोमवारी सकाळपर्यंत सुरू होता. भोगावती/कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ७४ एवढे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ५६० पैकी ४८६ एवढ्या प्रचंड संख्येने उमेदवारांनी अर्ज माघार घेतली आहे. या निवडणुकीसाठी तिरंगी लढत होणार हे निश्चीत झाले आहे.सोमवारी राष्ट्रवादी काँंग्रेसची चांगलीच नाचक्की झाली. सुरुवातीला काँग्रेसच्या मागे धावणाऱ्या राष्ट्रवादीने शनिवारपासून काँंग्रेसविरोधी शे. का. पक्ष, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, यांना बरोबर घेऊन महाआघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या. आघाडी करून उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेल्या दुसऱ्या मिनिटाला राष्ट्रवादीचे राधानगरी तालुका अध्यक्ष किसन चौगले आणि रघुनाथ जाधव यांनी उमेवारी मिळाली असताना ती नाकारून उमेदवारी अर्ज माघारी घेतले व आपल्याच पॅनेलला घरचा आहेर दिला. एवढ्यावर हा गोंधळ थांबला नाही, जे दिग्गज नामदेव पाटील, हंबीरराव पाटील, राजू कवडे, शिवाजी पाटील, अविनाश पाटील, संजय कलिकते आदींना उमेदवारी मिळाली नाही, त्यावरून तीव्र संताप व्यक्त केला. आघाडीने उमेदवारी नाकारलेच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोर दबाव गट तयार करण्याची हालचाल सुरू असून, यात नाराज असणाऱ्या या मंडळींच्याकडून येत्या चार दिवसांत आपली भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. राष्ट्रवादीत ही परिस्थिती असताना काँग्रेसमध्येदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही आहे. नवीन चेहऱ्याच्या प्रयत्नात पी. एन. पाटील यांनी आठजणांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं आहे. यातून काहीजणांनी नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे. माघारी मोठ्या होणार याचा अंदाज असल्याकारणांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अत्यंत योग्य नियोजन लावल्यामुळे माघारीची प्रक्रिया सुलभपणे पार पडली. आज (मंगळवार) ११ वाजता उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहेत.तिरंगी लढत : मोर्चेबांधणी सुरूभोगावती : ‘भोगावती’च्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत निश्चित झाली असून, काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी महाआघाडीच्या वतीने व सदाशिव चरापले यांच्या भोगावती परिवर्तन आघाडीच्या वतीने उमेदवार पॅनल जाहीर केले. महाआघाडीचे उमेदवार असे : कौलव गट- धैर्यशील आनंदराव पाटील-कौलवकर, विनोद विश्वास पाटील (ठिपकुर्ली), पांडुरंग विठ्ठल डोंगळे (घोटवडे), राशिवडे गट- तानाजी बंडोपंत ढोकरे (राशिवडे), बंडोपंत भाऊ किरुळकर (घुडेवाडी), संजय महादेव डकरे (राशिवडे), कसबा तारळे - शिवाजी भिकू पाटील (गुडाळ), दत्तात्रय हनमा पाटील (तारळे), कुरुकली गट -जनार्दन गुंडू पाटील (परिते), केरबा भाऊ पाटील (कोथळी), बबन शंकर पाटील (कुरुकली), सडोली गट- अशोकराव दिनकर पाटील (सडोली), सुरेश ज्ञानदेव चौगले (आरे), हसूर गट- रघुनाथ बापू पाटील (बाचणी), शामराव बाबूराव पाटील (भाटणवाडी). महिला प्रतिनिधी : मीनाक्षी मोहन पाटील (आणाजे), वंदना वसंतराव पाटील, मागासवर्गीय प्रतिनिधी अण्णाप्पा गणपती कांबळे (पुंगाव), भटक्या विमुक्त जाती बाबूराव सत्याप्पा हजारे (वाशी), संस्था गट : महेश बाजीराव वरूटे (आरे), इतर मागास गट : सुभाष पांडुरंग जाधव (शिरगाव),