शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:36 IST

भारत पाटील ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे! पक्षी ही सुस्वरे, आळविती!’ संत तुकाराम यांनी मानवाच्या जीवनामध्ये वृक्ष किती महत्त्वाचा ...

भारत पाटील‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे! पक्षी ही सुस्वरे, आळविती!’ संत तुकाराम यांनी मानवाच्या जीवनामध्ये वृक्ष किती महत्त्वाचा आहे हे गाथेमध्ये सांगितले आहे. ‘झाडे तो लेकुरें आपुली! लेकरासारखी जपावी!’ असं छत्रपती शिवाजी महराज यांना वाटत होतं. आपण स्वतंत्र भारताचे सुधारलेले नागरिक आहोत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला कधी अथर्पूणर्ता येईल? जेव्हा स्वच्छता, पर्यावरण समृद्धी आणि स्वयंपूर्णत: येईल त्यावेळी. आपल्या पूर्वजांनी आदर्श विकसित समाजाची स्वप्नं बघितली होती, यासाठी त्यांनी आपलें सगळे आयुष्य वेचले होते. त्यांनी दिलेल्या कृतिशील विचारांच्या शिदोरीवर आपण आज आपली गावे व आपला समाज समृद्ध करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. ‘राष्ट्र आपणाला काय देतं? यापेक्षा आपण राष्ट्राला काय देतो?’ हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती पर्यावरण व निसर्गाला आपला बंधू, सखा व देव मानणारी पवित्र संस्कृती आहे आणि याच पवित्र संस्कृतीतील खेड्यांत, शिवारात राहणारी व या मातीत घाम गाळून स्वत:ला घडविणारी आपण सारी माणसं आहोत. निसर्गाने आपणाला भरभरून दिले आहे; परंतु आपण मात्र निसर्गाची किती काळजी करतो? ‘आपल्या कर्म दरिद्रीपणामुळे आपण साऱ्यांनी पर्यावरणाची वाट लावली आहे.’ यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. निसर्गचक्र उद्ध्वस्त केले आहे. यामुळे सगळे मानवी जीवन संकटात आले आहे. पाणी, हवा, ग्लोबल वॉर्मिंग व प्रदूषण या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ‘एक झाड आपणाला काय काय देते? याचा मात्र आपण कधीही विचार करीत नाही.’ झाड आपणाला आॅक्सिजन देते व हा प्राणवायू आपणाला आजूबाजूला असलेल्या झाडांपासून फुकट मिळत असतो. यामुळे आपणाला त्याची अजिबात किंमत वाटत नाही. म्हणूनच आपण झाडांची बेसुमार कत्तल करीत सुटलो आहोत. झाडे लावण्यापेक्षा आपणाला ती तोडण्यातच आनंद वाटत आहे. या चुकीच्या मानसिकतेमुळे आज समस्त मानव जात धोक्यात आली आहे. झाड म्हणजे एक गाव असते. असंख्य फांद्यांवर अगणित पाने व फुले जशी गुण्यागोविंदाने नांदतात, एक पान दुसºया पानासंगे कधीही भांडत नाही. ‘एका झाडाचे खोड कधी दुसºया खोडाशी कोर्ट कज्जा खेळत नाही.’ हेच झाड आपणाला सावली देताना बाप असतं. फळ देताना ते आई होतं. पक्षांना आसरा देतं, तर माणसाच्या पिढ्यान्पिढ्या सातत्याने जगवत आहे. झाड आपणाला फळे, फुले, लाकूड, निवारा, औषधे, पाऊस, सावली तर देतच आहे; पण आई-बापाचे प्रेम व संस्कृती सुद्धा झाड आपणाला देत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी टिकवून आपली तहान पण भागवत आहे. भविष्यातील या संकटाला सामोरे जात असताना आपण साऱ्यांंनी ‘पर्यावरण समतोल व निसर्गचक्र याविषयी सर्वांची जशी आई मुलांचे संगोपन करते. त्या भावनेने आपण प्रत्येक मनुष्याने झाडांचे संगोपन केले पहिजे.’ अजूनही पन्हाळ्याच्या दोन्ही बांधारीमधील राक्षी, निकमवाडी, धबधबेवाडी, सोमवारपेठ, इंजौळे, खडेखोल, दळवेवाडी, बंदिवडे, करंजफेण व पलीकडील बुधवारपेठ, नेबापूर, आपटी, जेऊर, वेखंडवाडी, बादेवाडी, बोरिवडे परिसरामध्ये भरपूर झाडं लावली पाहिजेत, असे मला वाटते. यामुळे बºयाच समस्या सुटतील. यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे हे तेथील सर्वसामान्य लोकांच्या हिताचे आहे, असे मला वाटते. २00५/६ मध्ये पाऊस खूप झाला होता. ‘त्यावेळी बुधवारपेठपासून मसाई पठारपर्यंत 3 इंचांपासून ते 3.५ मीटरपर्यंतच्या भेगा पडल्या होत्या.’ आपटी गावात तलावाशेजारी जमिनीचे भूस्खलनही झाले होते. त्यात बºयाच घरांचे नुकसान झाले होते. त्यावेळी सरपंच विश्वास पाटील यांनी खूप मेहनत घेतली होती. नावली पैकी धारवाडी येथे जमीन घसरली होती. तसेच मराठवाडी व केकतवाडी येथील डोंगर सरकला होता. यामुळे तेथील लोकांचे वास्तव्यच धोक्यात आले होते. या दोन्ही वाड्यांचे पुनर्वसन करण्याची वेळ आली होती. तशी ही पन्हाळा व दोन्ही बांधारींसाठी धोक्याची घंटा आहे. ही गंभीर बाब आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, विकास देशमुख, तहसीलदार समीर शिंगटे व माझी सगळी पंचायत समिती आणि जिआॅलॉजिस्ट्स मोरे यांचे खूप मोठे सहकार्य झाले होते. नैसर्गिक आपत्तीवेळी अधिकारी व लोकप्रतिनिधी मनापासून एक होऊन काम करण्याचा अनुभव मला खूप काही शिकवून गेला. ‘ग्रामपंचायतमध्ये आता वृक्षांची नोंदवही ठेवलीच पहिजे. प्रत्येक गावात गाव तिथे रोपवाटिका निर्माण केली पहिजे.’ दरवर्षी गावात दरमाणशी झाडं लावली पाहिजेत.(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्तीचळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत)