शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांनी घेतली झाडाझडती

By admin | Updated: June 19, 2015 00:22 IST

चोक्कलिंगम यांची क्रीडासंकुलास भेट : कामाच्या दर्जाबाबत कंत्राटदार, प्रशासकीय अधिकारी, क्रीडाधिकारी धारेवर

कोल्हापूर : संभाजीनगर येथील बहुचर्चित क्रीडासंकुलास पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी गुरुवारी सकाळी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कंत्राटदार, प्रशासकीय अधिकारी व क्रीडाधिकारी यांना कामाच्या दर्जाबाबत धारेवर धरले. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ बांधकाम सुरू असलेले क्रीडासंकुल अजूनही वादाच्या भोवऱ्यातून काही केल्या सुटेना. गुरुवारी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी क्रीडासंकुलास भेट देत प्रथम टेनिस कोर्टची पाहणी केली. यावेळी गॅलरीकडे जाणाऱ्या मार्गावरील शटरला कमी दर्जाचा पत्रा का वापरला आहे, असे त्यांनी विचारले. पुढे त्यांनी ४०० मीटर धावपट्टीची पाहणी केली. यावरून धावपटूंना धावता येईल का, असा सवाल त्यांनी कंत्राटदार, अधिकारी यांना विचारला. धावपट्टीवर आणखी एक मातीचा थर पाहिजे. त्यानंतरच खेळाडूंना व्यवस्थित धावता येईल असे सुनावले. फुटबॉलच्या मैदानाची लेव्हल बिघडलेली आहे. ती सरळ करण्याची सूचना दिली. तेथून पुढे त्यांनी व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो मैदानांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी थेट शूटिंग रेंजची पाहणी केली. तेथून पुढे त्यांनी जलतरण तलावाची पाहणी केली. यात वारे वसाहत येथून जलतरण तलावात मिसळणारे पाणी जेसीबी लावून चर काढून बाहेर काढा, असे सांगितले. या दरम्यान फुटबॉल मैदानाच्या रस्त्याकडील कडेला प्रेक्षक गॅलरी बांधून गाळे भाड्याने देण्याची कल्पना जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी आयुक्तांना सांगितली. यावर विभागीय आयुक्तांनी भाडेकरू चांगले मिळाले तर बरे, अन्यथा वाद होत राहतात; त्यामुळे यावर पुनर्विचार करावा, असे सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, ‘सार्वजनिक बांधकाम’चे अभियंता एन. एम. वेदपाठक, क्रीडा उपसंचालक एम. बी. मोटे, जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे, आदी अधिकारी उपस्थित होते. चक्क भिंतीवर चढून केली पाहणी !चोक्कलिंगम यांनी जलतरण तलावात जेलच्या ताब्यात असणाऱ्या जागेतून कसे पाणी येते याची पाहणी तलावाशेजारी बांधलेल्या भिंतीवर चढून केली. यावेळी त्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, क्रीडा उपसंचालक एम. बी. मोटे, नवनाथ फरताडे हेही भिंतीवर चढले होते.कोल्हापुरातील संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलाची गुरुवारी सकाळी पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अभियंता एन. एम. वेदपाठक, क्रीडा उपसंचालक एम. बी. मोटे, जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे, प्रांताधिकारी प्रशांत पाटील, आदी उपस्थित होते.