शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; पुण्यासाठी १५० रुपये जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:29 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतर गणेशोत्सवाकरिता गणेशभक्त आपापल्या गावी आले आहेत. मात्र, त्यांना आपल्या गावी पोहोचण्यासाठी दीड ते ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतर गणेशोत्सवाकरिता गणेशभक्त आपापल्या गावी आले आहेत. मात्र, त्यांना आपल्या गावी पोहोचण्यासाठी दीड ते दुप्पट जादा पैसे मोजावे लागले. एसटी बसेसच्या तुलनेत खासगी बसेसना प्रवाशांकडून मागणी अधिक आहे. त्यामुळे दरवाढ केली आहे. कोल्हापुरातून पुण्यासाठी जायचे असेल तर ६०० ते ७०० रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी हाच दर ४५० ते ५५० रुपये इतका होता.

कोरोनाच्या सलग दोन लाटांमुळे गणेशोत्सवाकरिता भक्तांना आपल्या गावी येता आले नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला वेगळे महत्त्व आले. अनेक गणेशभक्तांनी खासगी बसेसचे आरक्षण करून गाव गाठले. त्याकरिता नियमित तिकिटापेक्षा दुप्पट पैसे मोजले. मागील आठवड्यापासून हे दर वाढले आहेत. अनेक खासगी वाहतूकदारांनी गणेशोत्सव अक्षरश: कॅश केला. गेले दीड वर्षे या वाहतूकदारांच्या बसेसना काम नव्हते. त्यामुळे ही मंडळी आर्थिक अरिष्टात अडकली होती. त्यात डिझेल दरवाढीमुळेही तिकीट दर परवडनासे झाले असल्याचे मत अनेक वाहतूकदारांनी व्यक्त केले. दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसला.

या मार्गावर सर्वाधिक ट्रॅव्हल्स

कोल्हापूर - पुणे

कोल्हापूर - मुंबई

कोल्हापूर - सोलापूर

कोल्हापूर - लातूर

कोल्हापूर - औरंगाबाद

कोल्हापूर - नागपूर

कोल्हापूर - नाशिक

आधीचे दर सध्याचे दर

कोल्हापूर - पुणे ४५० ते ५५० ६०० ते ७००

कोल्हापूर - मुंबई ७०० ते ९०० १००० ते १२००

कोल्हापूर - सोलापूर २५०-३५० २५०- ४००

कोल्हापूर - नाशिक ७००-८०० ९०० -१०००

कोल्हापूर - औरंगाबाद ८०० ते ९०० १००० - १२००

कोल्हापूर - नागपूर १००० - १२०० १२०० ते १४००

दोन वर्षांनंतर बरे दिवस

गेल्या दीड वर्षांपासून खासगी बसवाहतूकदारांना अनेक समस्यांना सामाेरे जावे लागले आहे. कराच्या बोजामुळे हा व्यावसायिक दबला गेला आहे. वाढत्या डिझेल दरवाढीसह कोल्हापूर-पुणे-मुंबई-नागपूर या मार्गावर टोल आणि सरकारचे करांमुळे दरवाढीशिवाय पर्याय राहिलेला नाही.

- सतीशचंद्र कांबळे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा खासगी बस वाहतूकदार संघटना

प्रवाशांना फटका

गणेशोत्सवाच्या काळात खासगी बसेसची ही दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे यावर आरटीओ अथवा तत्सम यंत्रणांचे नियंत्रण हवे. जेणेकरून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

आशुतोष जाधव, प्रवासी

एसटीच्या तुलनेत ही भाडेवाढ जादाची आहे. आधीच कोरोनामुळे आम्ही मंडळी आर्थिक घाईला आलो आहोत. त्यामुळे खासगी बसेस वाहतूकदारांनीही भाडेवाढीचा फेरविचार करावा.

अजय मोरे, प्रवासी