शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे ‘बिºहाड’ दोन वर्षाला बदलणार बदलीचा नवा अध्यादेश; पोलिसांमधून नाराजी

By admin | Updated: May 11, 2014 00:45 IST

गणेश शिंदे (कोल्हापूर) : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’असे ब्रीदवाक्य असलेले व २४ तास जनतेच्या सदैव रक्षणात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी

गणेश शिंदे (कोल्हापूर) : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’असे ब्रीदवाक्य असलेले व २४ तास जनतेच्या सदैव रक्षणात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात बदल्यांच्या नव्या अध्यादेशामुळे नाराजी निर्माण झाली आहे. या नव्या अध्यादेशामध्ये एकाच उपविभागीय पोलीस विभागात आता चार वर्षे सेवा करण्याचा नियम राज्य शासनाने केलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सहा उपविभागीय कार्यालये आहेत. यातून पोलीस कर्मचार्‍यांची जिल्हाअंतर्गत २४ वर्षे सेवा होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. निम्मे पोलीस ठाणे रिकामे होणार या नव्या अध्यादेशामुळे पोलीस ठाण्यातील सुमारे ७० ते ८० टक्के पोलीस कर्मचारी रिकामे होणार आहेत. जिल्ह्यात सुमारे २४०० पोलीस कर्मचारी आहेत. पूर्वी एकाच पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍याला सहा वर्षे सेवा बजावावी लागत होती. आता हे चित्र बदलणार आहे. पोलीस महासंचालक यांनी या आदेशाला स्थगितीची मागणी कोणत्याही पोलीस अधिकार्‍याला प्रत्येक जिल्ह्यात पूर्वी सहा वर्षांची सेवा करता येत होती. तसेच एखाद्या पोलीस निरीक्षकाला दोन पोलीस ठाण्यांचा पदभार मिळत असे. मात्र, नव्या अध्यादेशामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकाला दोन वर्षे सेवा करता येणार आहे. या दोन वर्षांच्या अध्यादेशासाठी जिल्हा पोलीस प्रशासन राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी या अद्यादेशाला स्थगिती द्यावी अशी मागणी पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांतून होत आहे. १५ मेपर्यंत विनंती अर्ज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी काल (शुक्रवार) सायंकाळी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला, ज्या पोलीस कर्मचार्‍यांची त्या पोलीस ठाण्यात ३१ मे २०१४ पर्यंत मुदत होत आहे, त्यांनी १५ मे २०१४ पर्यंत विनंती अर्ज करावेत, असे सांगितले आहे. त्या पोलीस कर्मचार्‍यांनी विनंती अर्जामध्ये तीन पोलीस ठाण्यांची पसंती दर्शवावी, असे सांगितले आहे. एका विभागात चार वर्षेच सेवा जिल्ह्यात करवीरसह शहर, इचलकरंजी, गडहिंग्लज, शाहूवाडी व जयसिंगपूर अशी उपविभागीय कार्यालये आहेत. सध्या शहर, करवीर, गडहिंग्लज या तीन विभागांचा पोलीस उपअधीक्षक पदाचा भार दुसर्‍या अधिकार्‍यांकडे आहे. समजा, शहर विभागातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात एखाद्या पोलीस कर्मचार्‍याची चार वर्षे सलग सेवा झाली तर त्याला बदलीसाठी इतर विभागाकरिता अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे त्या कर्मचार्‍याला जुना राजवाडा पोलीस ठाणे, शाहूपुरी व राजारामपुरी पोलीस ठाण्यांत सेवा करण्याच्या संधीपासून मुकावे लागणार आहे.