शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांनाही नोकरीमध्ये मिळणार आता आरक्षण, शासनाचा आदेश 

By विश्वास पाटील | Updated: March 15, 2023 11:28 IST

स्त्री, पुरुषासोबतच तृतीयपंथी असा असेल पर्याय

कोल्हापूर : राज्यातील तृतीयपंथीयांना शिक्षण, नोकरी व शासकीय योजनांमध्ये लिंग पर्यायामध्ये स्त्री, पुरुष यासोबतच यापुढे तृतीयपंथी असा पर्याय उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. त्याची तत्काळ व काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही शासनाने बजावले आहे. सामाजिक न्याय विभागाने त्यासंबंधीचा आदेश ३ मार्चला काढला आहे. सांगलीच्या संपदा ग्रामीण महिला संस्थेने (संग्राम) तृतीयपंथीयांना नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षण देण्यात यावे, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

केंद्र शासनाने तृतीयपंथीय व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम २०१९ मंजूर केला आहे. या अधिनियमातील प्रकरण ५ कलम ९ व १० मध्ये कोणतीही आस्थापना कोणत्याही तृतीयपंथी व्यक्तीशी, रोजगाराशी संबंधित कोणत्याही बाबतीत भेदभाव करणार नाही, अशी तरतूद केली आहे. राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (रिट पिटिशन क्रमांक ४००-२०१२ ६०४-२०१३) या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना तृतीयपंथीयांच्या सार्वजनिक नियुक्त्यांसाठी सर्व प्रकारचे आरक्षण द्यावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या सर्वांची दखल घेऊन राज्य शासनाने हा आदेश काढला आहे. शासकीय, सार्वजनिक प्राधिकरणांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व पदांच्या भरतीमध्ये अर्ज, आवेदनपत्रावर लिंग पर्याय म्हणून पुरुष व स्त्री घटकाबरोबर तृतीयपंथी हा पर्याय उपलब्ध करून द्यावा. मात्र, त्या पदाची सक्षम प्राधिकाऱ्याने निश्चित केलेली अर्हता तृतीयपंथीयांनाही पूर्ण करावी लागेल.आदेश कुणासाठी लागू..हा आदेश शासकीय, निमशासकीय, मंडळे, महामंडळे, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा, शासकीय विद्यालये, महाविद्यालये, शासकीय शैक्षणिक संस्था, खासगी विद्यालये, महाविद्यालये, शैक्षणिकसंस्था, अनुदानित, विनाअनुदानित विद्यालये व महाविद्यालये व शैक्षणिक संस्था आणि ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनाला आहे अशा सर्व इतर प्राधिकारणे, सेवा व संस्थांना हा आदेश लागू राहील.

महाराष्ट्र शासनाचा तृतीयपंथीयांना आरक्षण देण्याचा निर्णय त्यांचे जीवन बदलून टाकणारा आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी, समतेची वागणूक मिळून त्यांचे जगणे आत्मनिर्भर व्हावे, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे.मीना शेषू, अध्यक्षा, संग्राम संस्था, सांगली.

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार