शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्तांचा अधिकाºयांना दणका--सहा अधिकाºयांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 22:35 IST

कोल्हापूर : प्रशासनातील कामकाजाची विस्कटलेली घडी, कामांचा उठाव गतीने होत नसल्याच्या तक्रारी, कर्मचारी संघाचा कामकाजात होत असलेला हस्तक्षेप

ठळक मुद्देकर्मचारी संघाचा सतत हस्तक्षेप अधिकाºयांच्या मानसिकतेत बदल होत नाही म्हटल्यावर बदल्यांचे अस्त्र

भारत चव्हाण / कोल्हापूर : प्रशासनातील कामकाजाची विस्कटलेली घडी, कामांचा उठाव गतीने होत नसल्याच्या तक्रारी, कर्मचारी संघाचा कामकाजात होत असलेला हस्तक्षेप आणि नुकताच झालेला के.एम.टी. बस अपघात या सगळ्यांची गांभीर्याने दखल घेत महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी रात्री तब्बल सहा वरिष्ठ अधिकाºयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. मूळचे डॉक्टर असलेल्या चौधरी यांनी कारभार हाती घेतल्यानंतर प्रथमच तीव्र मात्रा असलेला डोस दिल्याने अधिकारीवर्गात एकच खळबळ उडाली आहे. आयुक्तांनी सामान्य प्रशासनातील कर्मचारी संघाचे वर्चस्व पूर्णपणे मोडून काढण्याचाही यातून प्रयत्न केला असल्याचे दिसते.

के.एम.टी.चा अपघात झाल्यानंतर शहरात महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध उफाळून आलेला संताप लक्षात घेऊन गेल्या दोन दिवसांपासून आयुक्त अभिजित चौधरी यांनी प्रशासनात बदल करून सहा अधिकाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता या बदल्यांच्या आदेशावर स'ा करूनच आयुक्तांनी कार्यालय सोडले.

बदली झालेल्यांमध्ये सहायक आयुक्त क्रमांक १ संजय भोसले, कामगार अधिकारी उमाकांत कांबळे, एलबीटी अधिकारी सुधाकर चल्लावाड, विवाह नोंदणी अधीक्षक गीता कारेकर, उपमुख्य लेखापाल सुनील बिद्रे, सामान्य प्रशासन अधीक्षक विश्वास कांबळे यांचा समावेश आहे.संजय भोसले यांच्याकडील सहायक आयुक्त क्रमांक १, रचना व कार्यपद्धती, सामान्य प्रशासन असे तीन कार्यभार काढून घेण्यात आले असून त्यांना केवळ के.एम.टी.कडील अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक म्हणूनच काम पाहण्यास बजावण्यात आले आहे. कामगार अधिकारी उमाकांत कांबळे यांच्याकडे प्रॉव्हिडंट फंड व विवाह नोंदणी निबंधक म्हणून कार्यभार देण्यात आला आहे.

एलबीटी अधिकारी सुधाकर चल्लावाड यांची या पदावरून उचलबांगडी करून त्यांच्याकडे रचना व कार्यपद्धती, सामान्य प्रशासन व कामगार अधिकारी असे तीन कार्यभार दिले आहेत. विवाह निबंधक गीता कारेकर यांना आता सामान्य प्रशासन विभागाचे सहायक अधीक्षक म्हणून कार्यभार दिला आहे. सामान्य प्रशासनाचे अधीक्षक विश्वास कांबळे यांची बदली विभागीय कार्यालय क्रमांक १ मधील घरफाळा अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. उपमुख्य लेखापाल सुनील बिद्रे यांना एलबीटी अधिकारी करण्यात आले आहे.

सामान्य प्रशासन विभागात कर्मचारी संघाचा सतत हस्तक्षेप होत असतो, तो अधिकाºयांच्या बदल्यांच्या माध्यमातून मोडून काढण्यात आला आहे. यापूर्वी आयुक्त चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्यापासून अनेक अधिकाºयांना कामातील दिरंगाईबद्दल ‘कारणे दाखवा नोटिसा’ दिल्या आहेत. तरीही अधिकाºयांच्या मानसिकतेत बदल होत नाही म्हटल्यावर बदल्यांचे अस्त्र बाहेर काढले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.