शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सुटीत गिरवतायेत व्यवहारांचे धडे...

By admin | Updated: May 27, 2015 01:02 IST

वेळेचा सदुपयोग : विद्यार्थी बनलेत स्वावलंबी

कोल्हापूर : विद्यापीठाच्या परीक्षा संपत आल्या आहेत. सुटीची लगबग असताना, सुटीत जॉब शोधण्यासाठी काही तरुणांची धडपड सुरू आहे. सुटीतील दोन महिने काम करायचे पुढील कॉलेजसाठी पैसे जमवायचे, असा नवा ट्रेंड सध्या सर्वत्र रूजत आहे. या नव्या ट्रेंडमुळे सुटीचा सदुपयोग, तर होतोच पण विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडेही मिळतात. सुटीत मामाच्या गावाकडे जाण्याची संकल्पना तरुणांच्या डोक्यातून केव्हाच गेली आहे. दोन-तीन महिने घरी बसून सुटी कशी घालवायचा, हा प्रश्न तरुणांना पडला असताना मुलांचा सुटीत शिबिरे, नवीन कोर्स शिकण्याकडे कल होता. यासह चित्रपट पाहणे, नदीकाठची झुळूक, डोंगरमाथ्यावरील स्वच्छ हवा आणि आमराईतली मोहरलेली सावली, अशी काहीशी संकल्पना तरुणाईची सुटीबद्दल होती. मात्र, महिन्याला मिळणारा पॉकेटमनी नेहमी अपुरा पडतो, या पॉकेटमनीत भर घालण्यासाठी तरुणाईचा आता सुटीत जॉब करण्याकडे कल वाढत आहे. त्यामध्ये काहीजण हा जॉब गरजेपोटी करतात, काही अनुभवासाठी करतात, तर काहीजण सुुटीचा सदुपयोग करण्यासाठी करत आहेत. या कामांतून मिळणाऱ्या पैशांतून पुढील वर्षाच्या कॉलेजचा खर्च, तर भागतोच पण त्याचसोबत कॉलेजसाठी स्वत:च्या पैशांतूनकपडे, बूट घेण्यासाठी करीत आहे. (प्रतिनिधी)परदेशातील तरुण-तरुणी सुटीत मोठ्या प्रमाणात जॉब करतात. ही संकल्पना खूप चांगली आहे. विद्यार्थ्यांकडे पुस्तकी ज्ञान तर असते; पण अशा समर जॉबमुळे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानही मिळते. त्याचा चांगला उपयोग भविष्यातील करिअरसाठी होतो. अनेक मुले कॉलेज संपल्यानंतर जॉब शोधण्यासाठी बाहेर पडतात. यावेळी मुलाखतीला सामोरे जाताना अनुभव नसल्याने ते मागे पडतात. मात्र, या अशा नोकरीतून त्यांच्या आत्मविश्वास वाढतो.- प्रा. सागर चरापले, शहाजी कॉलेज सध्या कॉलेजला सुट्ट्या पडल्या आहेत. सध्या एका खासगी कंपनीत सेल्समनचे काम करत आहे. त्यामुळे मला थोडे पैसे मिळतात, तसेच कामाची माहिती होत आहे. त्यामुळे सुटीचा सदुपयोग होत आहे. या पैशांतून मी माझे पुढील शिक्षण घेणार आहे. - प्रज्योत पाटील,कोल्हापूर