शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन व्यवहार करा; पण जपून

By admin | Updated: January 6, 2015 21:53 IST

अनेकांना गंडा : एटीएम, क्रेडिट कार्डधारकांना फटका

सुहास जाधव- पेठवडगांव -आॅनलाईन व्यवहार करणाऱ्या, तसेच ‘एटीएम’ कार्डचा पासवर्ड विचारून परस्पर पैसे चोरून नेण्याच्या प्रकारांत वाढ झालेली आहे. वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिन्यात पाच ते सात फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणी संबंधितांच्या तक्रारी पोलिसांनी घेतल्या आहेत.विशेष म्हणजे बॅँकेची गोपनीय माहिती लुटारूंकडे कशी जाते? कार्ड नंबर, फोन नंबर कसे पोहोचतात? तसेच आॅनलाईन विद्युत, टेलिफोन बिल भरणाऱ्यांचे पैसे परस्पर कसे काढले? हे प्रश्न या निमित्ताने पुढे आलेले आहेत. वडगाव पोलीस ठाण्याची हद्द सधन आहे. येथे राष्ट्रीय बॅँकांनी जाळे विस्तारले आहे. शहराच्या तुलनेत अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न असतो. तसेच वाढता इंटरनेटचा वापर सुरू आहे. सुख-सुविधांमुळे ‘प्लास्टिक मनी’ ही संकल्पना वापरण्यात येते. प्रत्येक व्यवहारासाठी ‘एटीएम’ किंवा नेट बॅँकिंगचा वापर सुरू असतो. हीच गोष्ट चोरट्यांनी हेरून या परिसरात आर्थिक लुटीचे टार्गेट सुरू आहे.पूर्वी उच्चशिक्षितांना नेट बॅँकिंगद्वारे लुटण्याच्या घटना ताज्या आहेत. नेट बॅँकिंगमध्ये महिन्यात लुटीच्या घटना वाढल्या आहेत. परिसरातील बॅँक आॅफ इंडिया, स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे एटीएम कार्ड असणाऱ्या खातेदारांना याचा फटका बसला आहे. या चोरट्यांनी आॅनलाईन रिचार्ज करणाऱ्यांचे पैसे कोणतीही चौकशी न करता हडपले आहेत; तर मनपाडळे येथील एका शेतकऱ्यास नेहमीचीच थाप मारली. त्याला चारवेळा फोन केला. त्या शेतकऱ्याने विश्वास ठेवून पासवर्ड दिला आणि रक्कम गमावण्याची वेळ आली. तर अन्य एका प्रकरणात असा पासवर्ड मागून खात्यावर रक्कम लंपास करण्यात आली.पोलीस व बॅँक प्रशासनाकडून वेळोवेळी पासवर्ड देऊ नका, असे आवाहन केले जाते. मात्र, दुसऱ्या बाजूला गोड गोड बोलून बॅँकेतून काळजीपोटी मोबाईल केल्याचे सांगून पैसे लुटण्याचा प्रकार सुरू आहे. हे माहीत असूनही फसवले जाते.