शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीच्यावेळी मुलीही वाचवणार लोकांचा जीव-कोल्हापुरात प्रशिक्षण सुरू: प्रात्यक्षिकांसह माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:56 IST

भूकंप, पूर, त्सुनामी, आग यासारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत आता मुलीही लोकांचा जीव वाचवणार आहेत. देशातील पहिली महिला आपत्ती व्यवस्थापन समिती (आपदा मित्र) कोल्हापुरात तयार होत

कोल्हापूर : भूकंप, पूर, त्सुनामी, आग यासारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत आता मुलीही लोकांचा जीव वाचवणार आहेत. देशातील पहिली महिला आपत्ती व्यवस्थापन समिती (आपदा मित्र) कोल्हापुरात तयार होत असून, त्यांचे १५ दिवसाचे प्रशिक्षण शुक्रवारपासून सुरू झाले.केंद्र सरकारच्या आपदा प्रशिक्षण उपक्रमासाठी देशातील विविध राज्यांमधील शहरांची निवड केली आहे. त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. याअंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने आपत्कालीन परिस्थितीशी सामना करणे व नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी कोल्हापूरमधून २०० जणांची रेस्क्यू टीम तयार करण्यात येत आहे. यापूर्वी नागपूरमधून ३५ व कोल्हापुरातून ३० अशी ६५ मुलांची टीम तयार केली आहे.आपत्ती म्हटली की मुलांची टीम लोकांना वाचविण्यासाठी जात असते. महिला हे काम करू शकणार नाहीत, असा एक समज असतो; पण आता मुलीही या संकटांशी सामना करण्यासाठी तयार होत आहेत. त्यासाठी कोल्हापुरातील विविध भागांतून ५० मुलींची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. मुलींची टीम तयार करणारा कोल्हापूर हा देशातील पहिला जिल्हा आहे. या मुलींना गृहरक्षक दल कार्यालयाच्या परिसरात प्रशिक्षण देण्यात येत आहे.हे प्रशिक्षण १५ दिवस चालणार असून, यात पूर, भूकंप, आग, त्सुनामी, इमारतींची पडझड, दरडी कोसळणे, वायू गळती, अशा नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवेळी लोकांचा जीव कसा वाचविला पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येत आहे. संरक्षण विभागाच्या उपनियंत्रक सोनल मेहरोळे, सहायक उपनियंत्रक बाबासाहेब मंगसुळे, सुधाकर सूर्यवंशी, अतुल जगताप हे अधिकारी मुलींना प्रशिक्षण देत आहेत.परीक्षाही होणारहे प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर, आजरा, चंदगड, इचलकरंजी, गारगोटी, भुदरगड, टाकवडे येथून मुली आल्या आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी मुलींची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षाही घेतली जाणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर