शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नवे दानवाडमध्ये संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:16 IST

शिरोळ : नवे दानवाड (ता. शिरोळ) येथे डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि अ‍ॅक्शन अ‍ॅड यांच्या संयुक्त ...

शिरोळ : नवे दानवाड (ता. शिरोळ) येथे डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि अ‍ॅक्शन अ‍ॅड यांच्या संयुक्त विद्यमाने महापूर संकटावर मात करण्यासाठी ग्रामस्थांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

गतवर्षी आपत्ती व्यवस्थापनाचे १९ प्रकारचे साहित्य नवे दानवाड ग्रामपंचायतीला दिले होते. यावर्षी गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली तर ग्रामस्थांवर येणाऱ्या आपत्कालीन संकटापासून कशाप्रकारे संरक्षण करावे यासाठी व गतवर्षी झालेल्या दोन दिवसीय प्रशिक्षणाचा पाठपुरावा घेण्यासाठी डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि अ‍ॅक्शन अ‍ॅड यांनी नवे दानवाड याठिकाणी एकदिवसीय प्रशिक्षण घेतले. यावेळी प्रशिक्षक वजीर रेस्क्यू फोर्सचे महेश भोई, प्रथमेश परिट व प्रथमेश पोतदार यांनी ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले.

यामध्ये लाईफ बॉय रिंगचा वापर कसा करावा, गाठीचे अनेक प्रकार, लाईफ जॅकेट कसे वापरावे, प्रथमोपचारांचा कसा व कधी वापर करावा तसेच आपत्ती म्हणजे काय तसेच अनेक साहित्यांचेही प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच वंदना कांबळे, कमल कांबळे, शहानूर गवंडी, राहुलराज कांबळे, अमोल कदम, नीता आवळे उपस्थित होते.

फोटो - १६०६२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - नवे दानवाड (ता. शिरोळ) येथे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यात आले.