शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षण १७ एप्रिलला : १८ एप्रिलपासून थंबद्वारे मिळणार धान्य

By admin | Updated: April 13, 2017 23:41 IST

तालुक्यातील १३८ रेशन दुकानांमध्ये ही पॉस मशीन देण्यात येणार आहेत

संदीप बावचे ---जयसिंगपूर  सार्वजनिक वितरण व्यवस्थेत शासनाने आणखी सकारात्मक पाऊल टाकले आहे. शासनाच्या अनुदानाचा खऱ्या अर्थाने गरजू व पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळावा, यासाठी रेशन दुकानांमधून आता पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य मिळणार आहे. शिरोळ तालुक्यात १३८ दुकानांसाठी ही मशीन उपलब्ध झाली असून, येत्या १७ एप्रिलला अंतिम प्रशिक्षण दुकानदारांना दिले जाणार आहे. त्यानंतर १८ एप्रिलला तालुक्यातील सर्वच दुकानांत पॉस मशीन बसणार आहेत. त्यामुळे आता हाताच्या अंगठ्याच्या ठशाद्वारे (थंब) यापुढे रेशनचे धान्य मिळणार आहे. संपूर्ण देशभरात कॅशलेस अर्थव्यवस्था राबविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. ग्रामीण भागात निगडित असलेला सामान्यवर्ग हा जास्त करून रेशन दुकानदारांच्या माध्यमातून जवळचा असल्याने केंद्र शासनाने व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून रेशन दुकानदारांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात सार्वजनिक वितरण व्यवस्था आणखी सुरळीत होण्यासाठी रेशन दुकानांमधून पॉस मशीनच्या माध्यमातून लोकांना धान्य देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तालुक्यातील रेशनकार्डचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तालुक्यातील १३८ रेशन दुकानांमध्ये ही पॉस मशीन देण्यात येणार आहेत. रेशनकार्डधारकांना अंगठ्याच्या ठशावर यापुढे आता धान्य मिळणार आहे. सोमवारी (दि.१७) सर्व रेशन दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वच दुकानांतून या पॉस मशीनद्वारे दुकानांचे व्यवहार सुरू होणार आहेत. भविष्यात : कॅशलेस व्यवहारग्रामीण भागात कॅशलेस व्यवहारास चालना देण्यासाठी केंद्र शासनाने डिसेंबर २०१६ मध्ये पाऊल उचलले होते. कॅशलेसला चालना देण्यासाठी व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून रेशन दुकानदारांची नेमणूक करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. शिरोळ तालुक्यातील जवळपास १३८ धान्य दुकानांत पॉस मशीन बसविली जाणार आहेत. या मशीनमध्ये कॅशलेस व्यवहार प्रणालीचीदेखील सोय उपलब्ध करण्यात आली आहे. सध्यातरी एकूणच आॅनलाईनद्वारे रेशन दुकानांतील व्यवहारांची नोंद होणार आहे.