शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

वारणा उजवा कालवा समस्यांचा सापळा

By admin | Updated: March 25, 2015 00:47 IST

शेती सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी शासनाच्या पाटबंधारे व कृष्णा खोरे विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीला पाण्याची सोय उपलब्ध करण्याची गरज

राजाराम कांबळे -मलकापूर --शाहूवाडी -पन्हाळा तालुक्यांतील कोरडवाहू शेती जलसिंचनाखाली आणून कर्नाटकमध्ये वाया जाणारे पाणी अडविण्यासाठी सुरू केलेला वारणा उजवा कालवा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी मृत्यूचा सापळा बनला आहे. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे या कालव्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. दोन्ही तालुक्यांतील शेती सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी शासनाच्या पाटबंधारे व कृष्णा खोरे विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीला पाण्याची सोय उपलब्ध करण्याची गरज आहे.वारणा उजवा कालव्याकरिता शासनाने १९७८ मध्ये १०० हेक्टर जमीन संपादित केली होती. त्यानुसार सरूड ते कोडोली अशा ४४ कि. मी. दरम्यान रुंदी १६ फूट, तर खोली १२ फूट, असे या कालव्याचे सुमारे १६ कोटी खर्चाचे नियोजन करण्यात आले होते. संबंधित शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या बाजारभावाप्रमाणे पैसे देण्यात आले होते.कालव्यामध्ये उड्डाण व भुयारी डक्टचा समावेश करून या कालव्याचे काम पूर्णपणे गळती विरहित होण्याकरिता स्लॅब मजबुतीकरण, अस्तरीकरण, स्विसलँड तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली होती. शासनाकडून सुरुवातीस सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. २००७ मध्ये या कालव्याचे काम पूर्ण होणार होते. मात्र, गेली नऊ वर्षे या कालव्याचे काम रखडले आहे. शासनाने उर्वरित निधी उपलब्ध करून दिलेला नाही.दरम्यान, कालव्याच्या खुदाईच्या कामातून उपलब्ध माती-दगडांचे मोठे ढीग पडल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मातीचे ढीगही ढासळून खुदाईचे काम मुजून गेले आहे. सिमेंट काँक्रीटच्या कामाला गळती लागून शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी हेऊन जमीन नापीक बनू लागली आहे. कोतोली, तुरुकवाडी, रेठरे, आदी गावांतील शेतकऱ्यांच्या घरांमध्ये या कालव्याला लागलेल्या गळतीमुळे पाण्याचे झरे उमळू लागले आहेत.या कालव्यात पावसाचे पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांसह शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. काही गावांच्या वेशीपासून हा कालवा पुढे गेल्याने तेथील रस्ता दोन्ही बाजूंनी मृत्यूचा सापळा बनला आहे. हा कालवा पुढे जाण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील जमीन शासनाने संपादित केलेली नाही.शाहूवाडी तालुक्यातील कोतोली, तुरुकवाडी, भेडसगाव, सरूड, डोणोली, चरण, आदी गावांतून कालवा गेला आहे. येथील शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन या कालव्याचे काम पूर्ण करण्याची गरज आहे.वारणा उजवा कालवा शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी मृत्यूचा सापळा बनला आहे.- शिवाजी सोनवळे, शेतकरीशासनाने या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करावे व शेतकऱ्यांच्या कोरडवाहू शेतीला पाण्याची सोय करावी.- शारदा डोंगरे, सरपंच, ग्रामपंचायत चरण