शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांकडूनच नियमांची पायमल्ली

By admin | Updated: March 18, 2015 00:03 IST

‘मार्च एंडिंग’ : वाहनधारकांची पिळवणूक

कोल्हापूर : नंबर व्यवस्थित अन् ठळक हवेत, जेणेकरून ते पटकन वाचता येतील, आदी नियम आहेत; पण या नियमांची नेहमी पायमल्ली होते. याकडे शहर वाहतूक शाखेचे लक्ष कसे नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. परंतु, वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांना वाहतूक पोलीस सन्मानाची वागणूक न देता ‘ए, चल गाडी बाजूला घे’, अशी अरेरावीची भाषा वापरत आहेत. कायद्याचे रक्षण करणारेच रस्त्यावर गुंडगिरी करू लागल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरात सध्या दुचाकींचा वापर करून घडत असलेल्या गुन्ह्यांमध्ये चोऱ्या, चेन स्नॅचिंग, अपहरण व अपघातांसारख्या घटनांचा समावेश असून, अशा गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या वाहनांना नोंदणी क्रमांक नसल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत. काही वाहनचालक वाहनांवर नंबर न घालता दादा, मामा, राज, राम, भाई, अमर, पाटील, राऊत असे फॅन्सी अक्षरातील नंबर लावतात. अशा वाहनांवर गेल्या वर्षभरापासून वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई सुरू आहे. मार्च एंडिंगचा कोटा पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून ‘दबंग’गिरी सुरू केली आहे. नियम पाळणाऱ्या वाहनधारकांकडेही गाडीच्या कागदपत्रांची मागणी करून सक्तीने दंडाची रक्कम वसूल केली जात आहे. बिंदू चौक, भवानी मंडप परिसरात बंदोबस्तास असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी तर कहरच केला आहे. बाहेरून आलेल्या पर्यटक, भाविकांना या पोलिसांकडून अरेरावीची भाषा ऐकावी लागत आहे. चार-पाचजणांची टीम बनवून चौका-चौकांत वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सध्या सुरू केली आहे. या टीमचा रुबाब आणि उद्धट भाषा यामुळे खाकी वर्दीतल्या गुंडगिरीचे दर्शन लोकांना पाहायला मिळत आहे. वाहनचालक परवाना असूनही गाडीची कागदपत्रके जवळ नाहीत, असे कारण सांगत सक्तीने दंडाची वसुली केली जात आहे, या वाहतूक पोलिसांबाबतीत नागरिकांतून तक्रारी वाढल्या आहेत. (प्रतिनिधी)नागरिकांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे. शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी सक्त सूचना देऊ.- अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक