शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसास मद्यधुंद तरुणाकडून मारहाण

By admin | Updated: July 11, 2017 00:56 IST

वाहतूक पोलिसास मद्यधुंद तरुणाकडून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : तिब्बल सीट मोपेड अडविल्याच्या रागातून मद्यधुंद तरुणाने वाहतूक पोलिसास शिवीगाळ व धक्काबुक्की करीत मारहाण केली. सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास लिशा हॉटेल चौकातील प्रकाराने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. शाहूपुरी पोलिसांनी मद्यधुंद तरुणास अटक केली. संशयित रमेश आनंदा चांदणे (वय ३०, रा. कपूर वसाहत, कदमवाडी) असे त्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी, शहर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन मधुकर हांगे (३०) हे सोमवारी सायंकाळी लिशा हॉटेल चौकात वाहतूक नियंत्रण करीत होते. यावेळी मार्केट यार्डकडून मोपेडवरून तिघे तरुण आले. त्यांची मोपेड अडवून वाहन परवान्याची चौकशी केली. परवाना नसल्याने तिब्बल सीट आल्याने दंड भरण्यास सांगितले. त्यावर चांदणे व त्याचे साथीदार जबरदस्तीने मोपेडवरून निघाले. त्यांना रोखले असता चांदणे याने वाहतूक पोलीस हांगे यांची कॉलर पकडून शिवीगाळ व धक्काबुक्की करत मारहाण केली. भर चौकात हा प्रकार घडल्याने वाहनधारकांची गर्दी होऊन वाहतूक काही काळ ठप्प झाली. वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत असलेल्या तिघा तरुणांना नागरिकांनी रोखून धरले. यावेळी चांदणे हा सापडला, तर त्याचे दोन साथीदार पळून गेले. यापूर्वी ताराराणी चौकात इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल स्वप्निल कांबळे यांना मद्य प्राशन करून नितीन शामराव पाटील (वय ३७, रा. कदमवाडी) याने मारहाण केली होती. उमा टॉकीज सिग्नल चौकात रेड सिग्नल पडल्यानंतर थांबण्याचा इशारा केल्याचा राग मनात धरून दोघा मद्यपी तरुणांनी वाहतूक शाखेच्या सहायक फौजदार जानबा शंकर देसाई (५७) यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी साईदास संजय शिंदे (वय २७, रा. टेंबे रोड, शिवाजी स्टेडियम), प्रीतम सतीश शिंदे (३०, रा. रविवार पेठ) यांना अटक केली होती. गेल्या सहा महिन्यांत वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण झाल्याची ही चौथी घटना आहे. खाकीचा प्रसाद रमेश चांदणे हा सेंट्रिंग कामगार आहे. भर चौकात पोलिसावर हात उगारुन तो नागरिकांच्यावर दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखविताच त्याची दारूच उतरली. हात जोडून तो पोलिसांना कारवाई करू नका म्हणून विनंती करीत होता.