शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक थाटात शाही दसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : तोफेच्या सलामीनंतर सुवर्णपालखीत विराजमान झालेली कोल्हापूरची करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, जुना राजवाड्यातील तुळजाभवानी, छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि गुरुमहाराजांच्या पालख्या, पोलीस बँड, पारंपरिक वाद्यांचा गजर, बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली मानवंदना, शाहू छत्रपतींच्या हस्ते शमीपूजन आणि दुर्गेची आरती सुरू असतानाच सुरू झालेल्या पावसाच्या साक्षीने शनिवारी कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : तोफेच्या सलामीनंतर सुवर्णपालखीत विराजमान झालेली कोल्हापूरची करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, जुना राजवाड्यातील तुळजाभवानी, छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि गुरुमहाराजांच्या पालख्या, पोलीस बँड, पारंपरिक वाद्यांचा गजर, बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली मानवंदना, शाहू छत्रपतींच्या हस्ते शमीपूजन आणि दुर्गेची आरती सुरू असतानाच सुरू झालेल्या पावसाच्या साक्षीने शनिवारी कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा साजरा झाला. ‘सोनं घ्या, सोन्यासारखं राहा’ म्हणत कोल्हापूरकरांनी दसºयाचा आनंद लुटला.कोल्हापूरची करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता विजयादशमीला सीमोल्लंघनाने झाली. कोल्हापूर संस्थानाचा अनोखा पारंपरिक शाही सीमोल्लंघन सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात रंगला.विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार-चोपदार, घोडेस्वार अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीरनिवासिनी अंबाबाई, तुळजाभवानीच्या उत्सवमूर्ती, कोल्हापूर संस्थानचे शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, शहाजीराजे, यशस्विनीराजे, यशराजराजे यांच्या हस्ते शमीपूजन झाले.यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अंजली पाटील, महापौर हसिना फरास, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, खासदार धनंजय महाडिक, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, संजय डी. पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तसेच सरदार घराण्याचे मानकरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.म्हैसूर-ग्वाल्हेरनंतर कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा प्रसिद्ध आहे. सायंकाळी पाच वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाई, तुळजाभवानीदेवी व गुरुमहाराज यांच्या पालख्या आपल्या लवाजम्यानिशी दसरा चौकाकडे प्रस्थान झाल्या. दरम्यान, शाहू छत्रपतींचेही ‘मेबॅक’ गाडीतून सोहळास्थळी आगमन झाले. येथे पोलीस बँडने देवीला मानवंदना दिली. शाहू महाराजांच्या हस्ते देवीची आरती सुरू झाली आणि जोरदार सरींनी पावसाला सुरुवात झाली. या पावसात शाहू छत्रपतींनी देवीची आरती व शमीपूजन केले. त्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून या शाही सोहळ्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी सोने लुटले. त्यानंतरही पाऊस सुरूच राहिला. अंबाबाईची पालखी आपल्या लवाजम्यानिशी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदीघाट, गंगावेश, पापाची तिकटी, गुजरीमार्गे रात्री मंदिरात परतली.अंबाबाईची रथातील पूजाआठ दिवस महिषासुराशी घनघोर युद्ध करून विजय मिळविलेल्या दुर्गेच्या विजयोत्सवाचा क्षण म्हणजे सीमोल्लंघन सोहळा. यानिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली.