शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

बारा बलुतेदारांची परंपरा जपणारे वंदूर

By admin | Updated: October 18, 2015 23:42 IST

गावची पंरपरा म्हणून ज्या त्या घरातील लोक विशेषत: सुशिक्षित तरुणही मानकरी म्हणून यात सहभागी होतात. हेच या वंदूर गावच्या दसऱ्याचे वैशिष्ट्य आहे.

कागल तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. राजघराण्याबरोबर सरदार, मनसबदार, वतनदार अशी विभागणी गावागावांत पाहावयास मिळते. एकेकाळी गावगाडा चालविणारे हे घटक बारा बलुतेदार-अठरा आलुतेदारांच्या सहकार्यातून हा गावगाडा हाकत. त्यामुळे पारंपरिक सण-उत्सवांमध्ये या सर्वच घटकांना मानपान असे. आज गावचा कारभार या मंडळींच्याकडे नाही. मात्र, वर्षानुवर्षे चालत आलेल्या पारंपरिक सण-उत्सवात ही पंरपरा भक्तिभावाने जपली जाते. वंदूर (ता. कागल) येथे पांरपरिक पद्धतीने साजरा होणार दसरा उत्सव बारा बलुतेदार-अठरा आलुतेदारांची परंपरा स्पष्ट करतो.इतिहासकालीन घाटगे घराणे प्रसिद्ध आहेच; मात्र कागलकर घाटगे यांच्याबरोबर केनवडेकर घाटगे, वंदूरकर घाटगे अशी ही भाऊबंदकी आहे. वंदूरच्या वतनदारांना सर्जेराव घाटगे म्हणत. आजही दसरा आणि इतर उत्सवांत सर्जेराव घाटगे, खातेदार सरकार म्हणून शिवसिंह विजयसिंग घाटगे यांना मान दिला जातो. पाच एकर परिसरात घाटगेंचा वाडा आहे. ग्रामदैवत हनुमान आहे. गावच्या पारंपरिक रचनेत संपूर्ण गावच या वाड्याभोवती वसलेले आहे. गावच्या दसऱ्याचे वैशिष्ट्य हे की, वतनदार, खातेदार या संकल्पना भारतीय स्वातंत्र्यानंतर संपुष्टात आल्या; पण परंपरा म्हणून या सण-उत्सवात त्या पाळल्या जातात. यामध्ये हिंदंूच्याबरोबर मुस्लिम मानकरीही आपापली भूमिका पार पाडतात. शिकलगार वाड्यातील जुनी हत्यारे स्वच्छ करून धार करून देतात. तब्बलजी ढोल, ताशे, नगारे वाजविण्यासाठी सज्ज राहतात. कोरवी सनई, पारंपरिक पेटीबाजा वाजवितात. हशमदार म्हणून नलावडे तलवार घेऊन मिरवणुकीत पुढे असतात. परीट समाजाकडे ध्वज (पांढरे निशाण) असतो. गावचे पाटील जे लिंगायत पाटील आहेत ते पालखीवर चौरी ढाळतात. आंबी लोक अब्दागिरी पकडतात. मशाल, दिवटी नाभिक समाजाकडे असते. पालखीला खांदा सुतार, लोहार देतात. दलित समाजाकडे तराळकी असते. गुरव हे पुजारी, तर जंगम स्वामी शिवलिंग पूजा, ब्राह्मण मुखपूजा, शिलंगण अशी ही विभागणी असते. नवरात्रीचे नऊ दिवस घाटगे वाड्यापासून सर्जेराव खातेदारांना वाजत-गाजत आणले जाते. आरतीनंतर परत सोडले जाते. दसऱ्या दिवशी गावात देवाची जंगी पालखी मिरवणूक निघते. गावच्या वेशीबाहेर शिलंगणाच्या माळावर सर्जेराव खातेदारांच्या हस्ते पूजा होऊन त्यांनी बंदुकीच्या फैरी हवेत उडविल्या की ग्रामस्थ सोने लुटतात. दसऱ्यानंतर येणाऱ्या मंगळवारी या सर्व मानकऱ्यांना सर्जेराव खातेदार जेवण देतात. त्यासाठी धनगर समाज बकरी देतो. आज काळ बदलला आहे. बारा बलुतेदार-अठरा आलुतेदार ही संकल्पना ऱ्हास होत आहे. तरीसुद्धा गावची पंरपरा म्हणून ज्या त्या घरातील लोक विशेषत: सुशिक्षित तरुणही मानकरी म्हणून यात सहभागी होतात. हेच या वंदूर गावच्या दसऱ्याचे वैशिष्ट्य आहे. - जहाँगीर शेख