शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनवाडामध्ये ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा

By admin | Updated: September 21, 2015 23:44 IST

६७ वर्षांपासून उपक्रम : गणराया अवॉर्ड स्पर्धेतही राधानगरी तालुक्यात द्वितीय क्रमांक

व्ही. जे. साबळे --तुरंबे  --सध्या गणेशोत्सवाचा माहोल आहे. गावोगावी, गल्लीगल्लीत अनेकजण एकत्र येऊन तरुण मंडळ स्थापन केले जाते. त्यातून दरवर्षी गणपती बसवण्याची प्रथा सुरू होते. शिवाय स्पर्धा, चढाओढ सुरू होतेच. यामध्ये सामाजिक सेवावृत्तीतून अनेक उपक्रम राबवणारेही आहेत. या सर्व गोष्टींना फाटा देत अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा याही वर्षी मोठ्या उत्साहात सुरू आहे. ६७ वर्षांची ही परंपरा धामधुमीच्या गतिमान युगामध्ये गावातील तरुण वर्गाने अखंडपणे जोपासली आहे. उद्देश, एकत्र गावाला एकोपा राहावा.राधानगरी तालुक्यातील पूर्व बाजूला दूधगंगा नदीतिरावर वसलेले अर्जुनवाडा गाव. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर १९४८ साली गावातील तरुण मल्लांना ही कल्पना सूचली. हनुमान तालीम मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. दादा कृष्णा यादव यांनी गावातील लोकांमध्ये एकोपा राहावा, गावात शांतता राहावी, या उद्देशाने आपल्या गावच्या मुख्य चौकात एकत्र गणपती बसवण्याची विनंती केली. या उपक्रमास नामवंत मल्ल पै. भाऊसो यादव, बापू रामजी पाटील, बळीराम तिकोडे, दत्तू वागरे, दादा हणमंत चौगले, पै. महिपती यादव, श्रीपती म्हाकवेकर, महान भारत केसरी दादू चौगले, शंकर बाले, सखाराम यादव, बचाराम पाटील यांनी दुजोरा दिला. १९४८ पासून गेली ६७ वर्षे या परंपरेला गावाने जपले आहे. ‘एक गाव एक गणपती’ परंपरा सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेपासून सुरू आहे. सध्या पै. सचिन पाटील, पै. भाऊसो पाटील आपल्या सहकारी मल्लांच्या माध्यमातून ही परंपरा चालवत आहेत. यावर्षीच्या गणराया अवॉर्ड स्पर्धेत अर्जुनवाडा गावाने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकासाठी आमची यावर्षी तयारी सुरू असल्याचे विद्यमान पदाधिकारी यांनी सांगितले. दरवर्षी गणपती मूर्तीची उंचीही तीन फूट असते. ही मूर्ती पैलवान रूपात असते. गणरायाचे आगमन व विसर्जन पारंपरिक चालीरितीतच होते.यावर्षी शाळकरी मुलींच्या लेझीम पथकाद्वारे गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. नामवंत मल्ल घडवणाऱ्या हनुमान तालीम मंडळाची ही परंपरा कायम राखत पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात मंडळ आग्रही असते. (वार्ताहर)