शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचे सांगलीत बेमुदत उपोषण सुरू

By admin | Updated: December 16, 2014 00:12 IST

एलबीटीला विरोध : ‘बंद’ला महापालिका क्षेत्रात संमिश्र प्रतिसाद

सांगली : स्थानिक संस्था कर (एलबीटी)च्या विरोधात सांगलीतील कृती समितीने आजपासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. एलबीटी हटाव व फौजदारी कारवाया मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही व्यापाऱ्यांनी केला. या आंदोलनाला पाठिंब्यासाठी पुकारलेल्या सांगली बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. एलबीटी हटावसाठी गेल्या दीड वर्षापासून सांगलीत कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. गेल्या महिन्याभरात महापालिकेनेही एलबीटी वसुलीसाठी कडक पावले उचलत ३० हून अधिक व्यापाऱ्यांवर न्यायालयात फौजदारी दाखल केली आहे. तसेच व्यापाऱ्यांचे दफ्तर तपासणीच्या हालचाली सुरू आहेत. यापूर्वी कृती समिती व ‘फॅम’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एलबीटी हटविण्याची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी पर्याय मिळेपर्यंत कर भरण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून सांगलीत व्यापाऱ्यांनी एलबीटी हटावसाठी एल्गार पुकारला आहे. सकाळी गणपती मंदिरासमोर व्यापाऱ्यांच्यावतीने आरती करण्यात आली. त्यानंतर सर्व व्यापारी सराफकट्टा, कापड पेठमार्गे महापालिकेच्या शाळा क्रमांक एकनजीक जमा झाले. तिथे त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. कृती समितीचे समीर शहा, विराज कोकणे, अनंत चिमड, सुरेश पटेल या चार व्यापाऱ्यांनी उपोषण सुरू केले. यावेळी बोलताना शहा व कोकणे म्हणाले की, एलबीटी हटविण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक आहेत. त्यांचा एलबीटी व जकात हटावला पाठिंबा आहे. पण राज्यातील २६ महापालिकांतील अधिकारी मात्र व्यापाऱ्यांवर फौजदारी, तसेच बँक खाती सील करण्याची कारवाई करीत आहेत. कोल्हापुरात तीन हजार, परभणीत १२००, तर सोलापुरात साडेतीनशे व्यापाऱ्यांवर फौजदारी केली आहे. एलबीटी हटणार असेल, तर कारवाई कशासाठी सुरू आहे? कारवाई मागे घ्यावी, यासाठी आमचे आंदोलन आहे. एलबीटी हटाव व फौजदारी कारवाई थांबविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत, हे आदेश निघेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात परभणी व्यापारी संघटनेचे आनंद भाकळे, अतुल शेळके, विक्रम रामसिघानी यांनीही सहभाग घेतला. शिवसेनेचे नगरसेवक गौतम पवार, तसेच सांगलीतील वैद्यकीय संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी मुकेश चावला, सुदर्शन माने, गौरव शेडजी, धीरेन शहा, आप्पा कोरे, प्रसाद कागवाडे, सोनेश बाफना आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)दहा कोटींची उलाढाल ठप्पबंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सांगलीतील कापडपेठ व सराफकट्टा या दोन बाजारपेठांना आज साप्ताहिक सुट्टीच होती. तसेच गणपतीपेठ, हरभट रोड, मारुती रोड, स्टेशन चौक परिसरातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये भाग घेतला. मार्केट यार्डातील व्यवहार मात्र सुरळीतपणे सुरू होते. कुपवाड व मिरजेतही ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामुळे सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा संघटनेने केला.आंदोलन राज्यव्यापी, तर सांगलीत का? : आयुक्तव्यापाऱ्यांच्या आंदोलनाबाबत पालिकेला कोणताही आक्षेप नाही. एलबीटीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेला नाही. पालिका कायद्यानुसार वसुलीची कारवाई करीत आहे. त्यांचे आंदोलन राज्यव्यापी आहे, तर मग ते सांगली महापालिकेसमोरच कशासाठी? असा सवाल आयुक्त अजिज कारचे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेवेळी उपस्थित केला. मंडपावरून वादावादीव्यापाऱ्यांच्या उपोषण आंदोलनाला महापालिकेने परवानगी नाकारली आहे, तर वाहतूक पोलीस व शहर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली होती. व्यापाऱ्यांनी पालिकेसमोरील शाळा क्रमांक एकच्या चौकात आंदोलनासाठी मंडप, स्टेज उभारले होते. पण सकाळी पालिकेच्या अतिक्रमण पथकाने हा मंडप व स्टेज काढून टाकले. ही कारवाई सुरू असतानाच सर्व व्यापारी आंदोलनस्थळी आले. यावेळी पालिकेचे अधिकारी व व्यापाऱ्यांत जोरदार वादावादी झाली. एकमेकांना अर्वाच्च भाषेत दूषणेही देण्यात आली. पालिकेचे पथक माघारी फिरल्यावर व्यापाऱ्यांनी पुन्हा स्टेज व मंडप उभारून उपोषणाला सुरूवात केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू : संजय पाटीलसांगलीचे खासदार संजय पाटील यांनी सकाळी आंदोलनस्थळी भेट देऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. पाटील म्हणाले की, राज्यातील भाजपचे सरकार एलबीटी हटविण्यासाठी कटिबद्ध आहे. पण त्याचवेळी महापालिकाही चालली पाहिजे. व्यापाऱ्यांनी घाई करू नये. दोन दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. पण त्यांची शिष्टाई यशस्वी झाली नाही. काल (रविवारी) रात्री ‘फॅम’चे मोहन गुरनानी यांनीही सांगलीत येऊन व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यांचीही मध्यस्थी असफल ठरली.