शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

महावितरण विरोधात व्यापारी आक्रमक

By admin | Updated: June 13, 2015 00:16 IST

सांगरूळ कार्यालयावर धडक : खंडित वीजपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब

कोपार्डे/सांगरूळ : सांगरूळ, खाटांगळे गावांत गेले अनेक दिवस वीजपुरवठा खंडित होत असल्याने सांगरूळ येथील व्यापारी असोसिएशनने महावितरणच्या कार्यालयावर धडक मारली. मात्र, या ठिकाणी कर्मचारी उपस्थित नसल्याने उपकार्यकारी अभियंता कार्यालयाशी संपर्क साधून टाळे ठोकण्याचा व निवेदन चिकटविण्याचा इशारा दिला. यानंतर धावाधाव करीत अधिकारी सांगरूळ येथे पोहोचले व निवेदन स्वीकारले.यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी नाळे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली. संभाजी नाळे यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्यासमोर ग्रामस्थांची विजेबाबत व्यथा मांडली. ते म्हणाले, बोलोली सबस्टेशनकडून वीजपुरवठा सुरू झाल्यापासून सर्रास करून रात्री वीज गायब, तर दिवसा कधी कधी असते. सांगरूळ गाव हे बाजारपेठेचे गाव असल्याने येथे छोटे-मोठे उद्योग आहेत, तर दुर्गम भागातील बारा वाड्यांतील जनता पावसाळ्याआधी दळप-कांडप करून साठा करण्यासाठी येथे येत असत. मात्र, वीजच गायब असल्याने मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण होण्याबरोबर व्यापारावर विपरित परिणाम होत आहे.याबाबत सांगरूळ येथील अधिकारी ए. के. नकाटे यांना वारंवार तोंडी व लेखी तक्रारी देऊनदेखील त्यांनी उपाययोजना केली नाही. येथील लाईनमन व वायरमन उडवाउडवीची उत्तरे देत फिडर ट्रीप झाल्याचे कारण सांगतात. मात्र, वारंवार घडणाऱ्या या प्रकारावर त्यांच्याकडून कोणताच उपाय झालेला नाही. बोलोली सबस्टेशनमधून वीजपुरवठा करण्याऐवजी कोगे येथून सुरू करा, असे सांगण्यात आले.यावेळी गिरण मालक व घरगुती ग्राहकांनी येथील कर्मचारी शशिकांत पाटील यांच्याबाबत तक्रारींचा पाढा वाचला. वीज बिल भरले नसल्यास पाटील अरेरावीची भाषा करीत महिलांनाही उद्धट उत्तरे देत असल्याचे उपकार्यकारी अभियंता आर. एन. चव्हाण यांना सांगितले. यावेळी चव्हाण यांनी कनिष्ठ अभियंता ए. के. नकाटे यांना, आपण अधिकाऱ्यांप्रमाणे रहा व जनतेला सेवा द्या, असा सल्ला दिला. जर कोणी कर्मचारी कामात कुचराई करीत असेल, तर त्याचा अहवाल माझ्याकडे पाठवा, अशी सक्त सूचना केली. यावेळी सोमवारी कर्मचाऱ्यांना बोलावून समज देऊ. यानंतरही कामात कुचराई केल्यास अशांवर कारवाई करू. तसेच वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन आर. एन. चव्हाण यांनी व्यापारी असोसिएशनला दिले. यावेळी संभाजी नाळे, प्रकाश कांबळे, सुरेश गाताडे, मारुती राजे, विलास तेली, अनिल चव्हाण, महेश मेठे, मुरलीधर कासोटे, नेमनाथ सनाके, पंडित नाळे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)