शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महापालिका कर्मचाऱ्यांचा ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे माग

By admin | Updated: February 16, 2017 00:42 IST

कामचुकारांना लगाम : ‘फिरतीवर जातोय’ असे सांगून दांडी मारणाऱ्यांवर होणार कारवाई

कोल्हापूर : सकाळी हजेरी झाली की नको ते उद्योग करायला मोकळे होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या ‘भटक्या’ कर्मचारी व अधिकाऱ्यांना आता लगाम बसणारआहेयापुढकामाव्यतिरिक्त कर्मचारी, अधिकारी कुठे कुठे फिरतात, काय काम करतात याची सगळी माहिती संगणकावर संकलित केली जाईल आणि ‘फिरतीवर जातोय’ असे सांगून कामावर ज्यांनी दांडी मारली असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महानगरपालिका प्रशासन लवकरच कर्मचाऱ्यांना ट्रॅकिंग सिस्टीमवर आणणार असल्याने हे शक्य होणार आहे. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कोणालाही थेट नियंत्रण ठेवता येत नव्हते. विभागप्रमुखसुद्धा त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यामुळे सकाळी अमुक ठिकाणी कामावर पाहणी करून येतो, असे सांगून गेलेले कर्मचारी अथवा अधिकारी संध्याकाळीच कार्यालयात यायचे. त्यामुळे कामाचा उठाव तर व्हायचा नाही आणि कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचीही मोठी कुचंबणा होत राहायची. आतापर्यंतचा हा कारभार सर्वांसाठीच त्रासदायक तसेच बेभरवशाचा होता. शहरातील नागरिकांसह प्रशासनाचीही त्यामुळे कुचंबणा होत होती. कर्मचाऱ्यांच्या कामचुकार वृत्तीला कुठेतरी लगाम घालण्यासाठी आयुक्त पी. शिवशंकर यांनी ज्या-ज्या विभागातील कर्मचारी बाहेर फिरती करतात, अशा सर्वांना ट्रॅकिंग सिस्टीममध्ये घेण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारची यंत्रणा सध्या महानगरपालिकेच्या सर्व वाहनांमध्ये बसविण्यात आली असून, तिचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे याच धर्तीवर कर्मचाऱ्यांनाही ट्रॅकिंग सिस्टीममध्ये घेतले तर कामात सुलभता येईल आणि त्यांच्यावर अंकुशही राहील, या हेतूने त्यांनी ही पद्धत स्वीकारली आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी संगणक व सॉफ्टवेअर क्षेत्रांत काम करणाऱ्या कंपन्यांकडून या संदर्भात निविदा मागविली होती. आदिती ट्रॅकिंग सिस्टीम कंपनी यांना हे काम देण्यात येणार असून, बुधवारी आयुक्त शिवशंकर व अन्य अधिकाऱ्यांना कंपनीने या यंत्रणेचे सादरीकरण केले. आयुक्तांनी या सॉफ्टवेअरमध्ये काही सुधारणा सुचविल्या आहेत. येत्या तीन महिन्यांत ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात ३०० कर्मचारीपहिल्या टप्प्यात ट्रॅकिंग सिस्टीममध्ये आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागातील ३०० कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश करून घेण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुकादम, सुपरवायझर, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता यांचा समावेश असेल. नंतर टप्प्या-टप्प्याने अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांनाही त्यात घेण्यात येईल. ही यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता प्रशासनास प्रतिमहा, प्रतिकर्मचारी ११५ रुपये खर्च येणार आहे. अशी असेल ट्रॅकिंग सिस्टीमट्रॅकिंग सिस्टीममध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन बंधनकारक. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांना तो विकत घेऊन देणार, पैसे पगारातून कपात करणार. मोबाईल फोनवर ‘एम्प्लॉई ट्रॅकिंग अ‍ॅप’ डाऊनलोड केले जाईल. कर्मचारी कोठे जातो, काय करतो याची नोंद संगणकावर होईल. विभागप्रमुख कर्मचाऱ्यांच्या नोंदी तपासतील.महिन्यातून एकदा नोंदीचा अहवाल आयुक्त कार्यालयाकडे जाईल.