शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

विषारी विदेशी तणाचा महाराष्ट्रात शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 04:59 IST

विजयसिंह यादव महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शेतात गाजरगवत, रानमोडी यांसारखे मानवी शरीरास व जनावरांना घातक असे ‘अ‍ॅम्बरोसिया अ‍ॅरटिमीसिफोलिया’ अर्थात ‘रॅगविड’ हे विदेशी, विषारी तण आढळून आले.

कोल्हापूर : पेठवडगाव येथील विजयसिंह यादव महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शेतात गाजरगवत, रानमोडी यांसारखे मानवी शरीरास व जनावरांना घातक असे ‘अ‍ॅम्बरोसिया अ‍ॅरटिमीसिफोलिया’ अर्थात ‘रॅगविड’ हे विदेशी, विषारी तण आढळून आले. त्यामुळे या घातक वनस्पतींचा शिरकाव महाराष्ट्रात झाल्याचे स्पष्ट होत आहे, अशी माहिती ‘निसर्गमित्र’चे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचूळकर व विजयसिंह यादव कॉलेजचे प्रा. दशरथ जगताप यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.डॉ. बाचूळकर, जगताप म्हणाले, ही वनस्पती उत्तर अमेरिका येथील असून, ती युरोप खंडातील विविध देशांत प्रामुख्याने आढळते. ही वनस्पती दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आॅस्ट्रेलिया, न्यू झीलंड, जपान, तैवान, चीन व भारतातील सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड येथेही आढळते. याबाबत २०१५पासून अधिकचा अभ्यास करता या वनस्पतीचे नैसर्गिक पुनरुत्पादन व प्रसाराबाबत अभ्यासाच्या नोंदी करण्यात आल्या. त्यात ही सूर्यफुल वर्गातील वनस्पती आहे. हिची उंची ३० ते ९० सेंटिमीटरपर्यंत वाढते. या वनस्पतीला उग्र वास असून, फुले येण्यापूर्वी ही वनस्पती हुबेहूब गाजरगवतासारखी दिसते. या वनस्पतीचे एक रोप वर्षभरात तीन हजार बिया तयार करते. फळे काटेरी व बिया सुमारे ३९ वर्षांपर्यंत अबाधित राहू शकतात. त्यामुळे ही वनस्पती शेतमालाचे उत्पादन घटविते. हवेमार्फत या वनस्पतीचे पसरणारे परागकण माणसांच्या सान्निध्यात आल्यास नाक, घसा सुजतो. श्वसननलिकेस सूज येते. सर्दीचा त्रास होतो. डोळ्यांना खाज, डोळे सुजणे, लाल होणे, शरीरावर तांबडे पट्टे उठणे, त्वचेवर गाठी निर्माण होणे, दम्याचा त्रास सुरू होणे आदी प्रकार होतात. स्थलांतर करणाºया पक्ष्यांच्या विष्ठेतून या वनस्पतीचा प्रसार झाला.