शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कणेरी, गोकुळ शिरगाव हॉटस्पॉटच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:23 IST

विजय कदम कणेरी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनासह सर्वचजण निकाराची लढाई लढत असले तरी कोरोनाचा अटकाव म्हणावा तितका कमी ...

विजय कदम

कणेरी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनासह सर्वचजण निकाराची लढाई लढत असले तरी कोरोनाचा अटकाव म्हणावा तितका कमी होताना दिसत नाही. कणेरीसह गोकुळ शिरगावमध्ये सध्या कोरोना रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने ग्रामस्थांपुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या आठवड्याभरात या दोन्ही गावांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून ही गावे हॉटस्पॉट बनत आहेत. गोकुळ शिरगावमध्ये जानेवारीपासून आजअखेर ७४ रुग्ण सापडले असून त्यापैकी ३८ रुग्ण बरे झाले आहेत. यातील एकाचा मृत्यू झाला असून ३५ रुग्ण उपचार घेत आहेत. गोकुळ शिरगावमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने सारी व इलीचे रुग्ण शोधण्याचे काम सुरू केले आहे. कणेरी आरोग्य केंद्रांतर्गत गोकुळ शिरगावमध्ये एकदाच कोरोना प्रतिबंध लसीकरण करण्यात आले आहे. गावची लोकसंख्या पाहता येथे लसीकरण वाढविण्याची गरज आहे. कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या कणेरी, कणेरीवाडी गावात कोरोनाचे रुग्ण वाढले असून कणेरीत जानेवारीपासून आजअखेर ४१ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी २६ रुग्ण बरे झाले असून ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर १२ रुग्ण उपचार घेत आहेत. कणेरीवाडीत जानेवारीपासून आजअखेर ४८ रुग्ण आढळले असून त्यापैकी २८ रुग्ण घरी परतले आहेत. यात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १८ रुग्ण उपचार घेत आहेत.

कोट : कणेरी प्राथमिक केंद्रावर १०४३९ नागरिकांनी लस घेतली आहे. सुरुवातीस कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती कमी झाल्याने लाभार्थ्यांची संख्या कमी होती. मात्र, आता लोकांच्या रांगा लागत आहेत.

-बी. एस. मस्के,

वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र,

कणेरी.

चौकट : पहाटेपासूनच रांगा

सुरुवातीला लसीकरणाला थंडा प्रतिसाद मिळाला होता, पण कोरोनाचा उद्रेक सुरू झाला तशी लोकांनी लसीकरणासाठी गर्दी केली. त्यातच १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केल्यानंतर लसीचा तुटवडा निर्माण झाला. मुळातच लस पुरवठा कमी असताना असा निर्णय जाहीर केल्याने मोठी गर्दी होऊन कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर लांबच लांब रांगा दिसत आहेत. पहाटेपासून नागरिक कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात येऊन बसतात. लस नाही मिळाली तर वादाचे प्रकार होत आहेत.