शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर टूरिझम कल्चरल फाउंडेशनतर्फे पर्यटन सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:02 IST

कोल्हापूर येथील कोल्हापूर टूरिझम अँड कल्चरल फाउंडेशनतर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रमांनी पर्यटन सप्ताह साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देकोल्हापूर टूरिझम कल्चरल फाउंडेशनतर्फे पर्यटन ५000 हून अधिक पर्यटकांचे सर्वेक्षण

कोल्हापूर : येथील कोल्हापूर टूरिझम अँड कल्चरल फाउंडेशनतर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रमांनी पर्यटन सप्ताह साजरा करण्यात आला.कोल्हापूर टूरिझम व कल्चरल फाउंडेशनमार्फत अध्यक्ष अमित चौकले यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना कोल्हापूर जिल्हा पर्यटन संवर्धन व विकासासंदर्भात सूचनांचे निवेदन दिले. फाउंडेशनमार्फत नवरात्रौत्सव काळात अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना उपलब्ध असलेल्या सोई आणि सुविधांसंदर्भात सर्वेक्षण अभियान राबविले. यामध्ये कोल्हापुरातील १५0 हून अधिक हॉटेल्स, लॉज आणि यात्री निवासामध्ये पर्यटकांसाठी असलेल्या सुविधांची माहिती जमा करण्यात आली.या सर्वेक्षणादरम्यान ५000 हून अधिक पर्यटकांची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये स्वच्छतागृहांची संख्या वाढविणे, मोफत पार्किंग सुविधा, अल्पदरात निवास व्यवस्था, पर्यटक माहिती केंद्र, पर्यटकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आदींची सोय व्हावी, अशा अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केल्या आहेत. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या प्रश्नांवर शासन स्तरावर पाठपुरावा करून भविष्यात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती चौकले यांनी दिली.या अभियानात शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्राध्यापक डी. एच. पवार, रोहित चौरे, फाउंडेशनचे उपाध्यक्ष रमेश पाटील, अमित गायकवाड, विशाल पवार यांनी सहभाग नोंदविला.

------------------------------------------(संदीप आडनाईक)

 

टॅग्स :tourismपर्यटनkolhapurकोल्हापूर