शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

पर्यटन महामंडळाचे कार्यालय कोल्हापुरात पूर्ववत सुरू करणार

By admin | Updated: January 8, 2016 01:01 IST

चंद्रकांत पाटील : भाजपच्या शिष्टमंडळाला ग्वाही

कोल्हापूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)चे कोल्हापूर जिल्ह्यातील सध्या बंद असलेले कार्यालय पुन्हा त्वरित सुरू करावे. त्याचबरोबर या ठिकाणी आवश्यकतेनुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. हे कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव , विजय जाधव यांच्या शिष्टमंडळाला दिली.‘एमटीडीसी’चे जिल्ह्यातील प्रादेशिक कार्यालय सध्या बंद आहे. हे कार्यालय परत शहरात सुरू करावे यासाठी विविध संघटना व नागरिकांनी सातत्याने आंदोलने केली आहेत; परंतु महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ८ डिसेंबर २०१५ ला कक्ष अधिकारी (पर्यटन), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांना पत्र लिहून सोलापूर येथे सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्याला कोल्हापूरच्या जनतेबरोबरच भारतीय जनता पक्षाने तीव्र विरोध केला आहे. महामंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय पुन्हा कोल्हापुरात सुरू व्हावे यासाठी, नुकतीच भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी बंद असलेले जिल्ह्यातील कार्यालय पुन्हा त्वरित सुरू करावे. त्याचबरोबर या ठिकाणी आवश्यकतेनुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. हे कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली आहे, अशी माहिती उपाध्यक्ष विजय जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली .