शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कुंडली बघायला आलेल्या तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:46 IST

कोल्हापूर : कुंडली बघण्यास आलेल्या महाविद्यालयीन तरुणीला खडीसाखरेतून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू ज्योतिषास राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक ...

कोल्हापूर : कुंडली बघण्यास आलेल्या महाविद्यालयीन तरुणीला खडीसाखरेतून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू ज्योतिषास राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. संशयित मनोज ऊर्फ बाबा मधुकर नरके (वय ५०, रा. छत्रपती कॉलनी, सागरमाळ-शास्त्रीनगर) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, शहरातील एका महाविद्यालयात कला शाखेच्या शेवटच्या वर्षात २0 वर्षांची तरुणी शिकते. ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही करते. घरची परिस्थिती बेताची आहे. तिचे वडील दारू पिऊन आईसह तिला मारहाण करतात. रोजचा वडिलांकडून होणारा त्रास तिने आपल्या मैत्रिणीला सांगितला. तिने कौटुंबीक कलहाचा त्रास कमी होण्यासाठी तिला ओळखीच्या ज्योतिषी नरके याच्याकडे नेले. त्यांच्याकडून कुंडली काढून सल्ला घेण्यास सांगितले. १ डिसेंबरला मैत्रिण न आल्याने पीडित तरुणी एकटीच रिक्षाने भोंदू ज्योतिषी नरकेच्या घरी गेली. तिने कुंडली काढायची आहे. त्यासाठी किती खर्च येईल, अशी विचारणा केली. त्यावर नरकेने कुंडलीचे १५0 व सल्ला देण्याचे १५0 असे मिळून ३00 रुपये खर्च येईल, असे सांगितले.त्यानंतर नरके हा पीडित तरुणीला घरी बसवून, आपल्या लहान मुलाला शाळेत सोडण्यास गेला. पुन्हा अर्ध्या तासाने तो घरी आला. त्यानंतर घरातील एका खोलीत पीडित तरुणीला नेले. दरवाजा बंद करून तिची समस्या जाणून घेतली. त्यानंतर तिला कुंडली काढून दिली. काही उपाय सांगितले. त्यानंतर पीडित तरुणीने मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. मला यश येईल का? अशी विचारणा केली. त्यावर नरकेने त्यासाठी तुला एक विधी करावा लागेल. अंगावरील वस्त्र काढावे लागतील. आजपर्यंत १६ ते ६० वर्षांतील अनेक तरुणी व महिलांवर मी असा विधी केल्याचे सांगितले.नरकेच्या बोलण्याने तरुणीला धक्काच बसला. ती वस्त्र काढण्यास तयार नव्हती. तिची भांबावलेली अवस्था पाहून नरकेने तिला मला परमेश्वराचा आताच संदेश आला आहे. काही काळासाठी परमेश्वर सकारात्मक ऊर्जा देणार आहे. ती तुला देणार आहे, असे म्हणून खडी साखर खाण्यास दिली. त्यानंतर काही सेकंदात तरुणीला भुरळ आली. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर तरुणीला मानसिक धक्काच बसला. तिने तेथून सुटका करून आपले घर गाठले. या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर सोमवारी फिर्याद दिल्यानंतर भोंदू नरकेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील करीत आहेत.बंद खोलीत भविष्यमला परमेश्वराचा आशीर्वाद आहे. देव जी ऊर्जा देतो, ती इतरांच्या शरीरात मी सोडतो, असे सांगणारा भोंदू नरके बंद खोलीत भविष्य सांगत होता. त्याच्या खोलीत धूप, अगरबत्तीचा वास कोंडलेला असतो. भविष्य सांगणारी अनेक पुस्तके त्याच्याकडे आहेत. तो खोलीत गेल्यावर घरातील लोकांना येण्यास मज्जाव करतो.भोंदू नरके विवाहितनरके हा विवाहित असून, घरी पत्नी, मोठी मुलगी खासगी नोकरी करते, तर मुलगा कॉलेजला आहे. दुमजली घरात वरच्या मजल्यावर त्याच्या भावाचे कुटुंब राहते. कुंडली बघण्याच्या नावाखाली त्याने अनेक युवती, महिलांवर अत्याचार केला असून, बदनामीमुळे तक्रार देण्यास कोणी पुढे आले नसल्याची चर्चा परिसरात आहे.