कोल्हापूर : ‘कोरोना अनलॉक’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ उद्या, शनिवारी (दि. १२) सायंकाळी पाच वाजता पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉल येथे होणार आहे. पत्रकार गुरुबाळ माळी यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे.
कोल्हापूर प्रेस क्लब व अक्षर दालन प्रकाशनच्या वतीने होणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दौलत देसाई असणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास योजनेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री व प्रकाशक अमेय जोशी यांनी केले आहे.